आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

5 वर्षांत 1 कोटी नोकऱ्या देऊ, कर्नाटक निवडणुकीच्या जाहीरनाम्यात काँग्रेसचे वचन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळुरू - काँग्रेसने शुक्रवारी मंगळुरूत कर्नाटक निवडणुकीचा जाहीरनामा घोषित केला. पाच वर्षांत काँग्रेसने ९५ टक्के कामे पूर्ण केली आहेत. आम्ही या जाहीरनाम्यात लोकांच्या मनातील गोष्टींना मांडण्याचा प्रयत्न केला आहे. बंदखोलीत ३-४ लाेकांनी मिळून तयार केलेला हा जाहीरनामा नाही. विरप्पा मोईली यांनी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील लोकांशी संवाद साधला.

 

त्यानंतर जाहीरनामा तयार करण्यात आल्याचे राहुल यांनी सांगितले. आमचा जाहीरनामा भाजपसारखा नाही. त्यांच्या जाहीरनाम्यात संघ व रेड्डी बंधूंचा छुपा अजेंडा आहे. खरे तर आपल्या सर्वांनाच कर्नाटकवर गर्व आहे. या राज्याने देशाला सिलिकॉन व्हॅलीची भेट दिली. मी कर्नाटकला त्याबद्दल धन्यवाद देऊ इच्छितो, असे राहुल म्हणाले.

 

जाहीरनाम्यातील ५ मुद्दे
* ५ वर्षांत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू.
* राज्यात १० कृषी-हवामान विभागांना परस्परांना जोडून कृषी कॉरिडोर तयार करू.
* काँग्रेस सरकार सत्तेवर आल्यास पाच वर्षांत एक कोटी नोकऱ्या देऊ.
* सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देऊ. शेतीला १०० टक्के किटकनाशकमुक्त करू.
* राज्याला कुपोषणमुक्त करण्यासाठी आरोग्य भाग्य योजनेचा विस्तार.

बातम्या आणखी आहेत...