आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारला शेतकऱ्यांची नव्हे, उद्योगपतींची काळजी; त्यांच्याकडून मलाई मिळते: अण्णा हजारे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फरिदाबाद- केंद्र सरकारला शेतकऱ्यांची नव्हे, तर उद्योगपतींची सर्वाधिक चिंता वाटते. म्हणूनच त्यांचे कर्ज माफ केले जातात. कारण उद्योगपतींकडून सरकारला मलाई मिळते, अशी घणाघाती टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली आहे. रविवारी ते आयएमटी येथील शेतकऱ्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना बोलत होते.  


‘भारत माता की जय’,  ‘वंदे मातरम’ अशी घोषणा देत अण्णांनी भाषणाला सुरुवात केली. आता ‘माल खाए मदारी आैर नाच करें बंदर’ असे चालणार नाही. देशात शेतकरी कष्ट करत आहेत आणि नेते मौज करू लागले आहेत. अजूनही वेळ गेलेली नाही. माेदी सरकारने जागे व्हावे. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात. अन्यथा २३ मार्चपासून रामलीला मैदानावर पुन्हा एकदा मोठे आंदोलन केले जाईल, असा इशारा हजारे यांनी दिला.  


१९४७ मध्ये देशातून इंग्रज भलेही निघून गेले. देश स्वतंत्र झाला. गोरे गेले मात्र मन काळे असलेल्या लोकांच्या हाती सत्ता आली आहे. गरिबांवर अन्याय आणि शेतकऱ्यांवर अत्याचार होत आहेत. म्हणूनच देश स्वतंत्र होऊन काहीही फरक पडत नाही. निवडणुकीपूर्वी मोदींनी काळा पैसा परत आणू, प्रत्येक नागरिकाच्या खात्यात १५  लाख रुपये जमा होतील, अशी आश्वासने दिली होती. आतापर्यंत १५ रुपयेदेखील का जमा झाले नाहीत ? तुमचे अच्छे दिन कोठे आहेत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.  


‘दिल्ली सरकारबद्दलही बोलावे ’
केंद्रातील सरकारने ५ लाखांचा विमा, जमिनीचा मोबदला वाढवला. पीक नुकसानीची भरपाईदेखील सरकार देत आहे.  त्यामुळेच हजारे यांनी त्यांचे समर्थन असलेले दिल्लीतील सरकार काय करत आहे हेदेखील सांगितले पाहिजे, असे राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर यांनी म्हटले आहे.  


८० व्या वर्षी देशभर दौरा  
हजारे म्हणाले, मी ८० व्या वर्षी देशभरातील सामान्य नागरिकांच्या भल्यासाठी हा दौरा काढला आहे. व्यवस्थेत परिवर्तन करण्यासाठी लोकांना रामलीला पोहोचण्याचे आवाहन करत आहे. सरकारने जनलोकपाल विधेयकाला कमकुवत केले आहे. त्यामुळेच भाजपने ते तीनच दिवसांत पारित केले. स्वामिनाथन आयोगाच्या अहवालाला पूर्णपणे लागू करणे, शेतकऱ्यांची दयनीय स्थिती इत्यादी मुद्द्यांवर व्यापक आंदोलन उभारण्यासाठी देशभरातील जनतेला जागरूक करण्याचा माझा प्रयत्न आहे.   

बातम्या आणखी आहेत...