आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1 एप्रिलपासून व्हॉटसअॅपवर गुड मॉर्निंग मेसेजवर 18% GST, जाणून घ्या व्हायरल सत्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल डेस्क - सकाळी झोपेतून उठताच बहुतांश लोक सर्वात आधी व्हॉट्सअॅप चेक करतात. यावर गुड मॉर्निंगचे अनेक मेसेजस आलेले असतात. पण जर तुम्हाला कळले की, गुड मॉर्निंग मेसेज पाठवल्यास टॅक्स लागेल तर तुम्हाला काय वाटेल? नक्कीच तुमच्या अडचणीत आणखी भरच पडेल. सोशल मीडियावर अशाच एका व्हायरल होत असलेल्या मेसेजने लोकांच्या त्रासात वाढ केली आहे. वृत्तपत्राचे एक कात्रण व्हायरल होत आहे ज्यात लिहिले आहे की, 1 एप्रिलपासून गुड मॉर्निंग मेसेज पाठवल्यास 18 टक्क्यांपर्यंत जीएसटी लागेल. मेसेजमुळे सर्वजण संभ्रमात पडलेले आहेत. लोक फेसबुकपासून ते व्हॉट्सअॅपवर तऱ्हेतऱ्हेच्या कॉमेंट्स यावर करत आहेत. यामुळेच आम्ही या व्हायरल मेसेजचे सत्य येथे सांगत आहोत.

 

वृत्तपत्राच्या कात्रणात काय लिहिले आहे?
वृत्तपत्राच्या कात्रणात मोठ्या हेडिंगमध्ये लिहिले आहे की, गुड मॉर्निंग मेसेजवर लागेल 18% GST. वृत्तामध्ये आहे की, 1 एप्रिलपासून जे गुड मॉर्निंग मेसेज पाठवले जातील त्यावर सरकार टॅक्स लावणार आहे. मोबाइल संचार मंत्रालयाचे चीफ सेक्रेटरी लेखपाल यांच्यानुसार, तुम्ही जो काही गुड मॉर्निंग मेसेज पाठवाल, व्हॉट्सअॅप मेसेंजर त्याचा रेकॉर्ड ठेवेल. अशा मेसेजेसवर 18 टक्के जीएसटी ठरवण्यात आलेला आहे, ज्याचे बिल महिन्याच्या अखेरीस तयार केले जाईल आणि मोबाइल बिलासह त्याचे पेमेंट करावे लागेल.


वृत्तामध्ये इंटरनेट स्लो केल्याचा आरोप 
वृत्तपत्राच्या कात्रणात जीएसटी लागू करण्याचे कारणही देण्यात आले आहे. त्यात लिहिले आहे की, सरकारने हा निर्णय एका रिपोर्टनंतर घेतला. ज्यानुसार सकाळी-सकाळी कोट्यवधी गुडमॉर्निंग मेसेज पाठवण्यात येत असल्यामुळे भारतात इंटरनेट स्लो होऊन जाते. भारत जगातील एकमेव असा देश आहे जेथे इंटरनेटबाबत असे होत आहे. यामुळे टॅक्स लावल्याने गुड मॉर्निंग मेसेज पाठवणाऱ्यांची संख्या कमी होईल आणि इंटरनेट स्पीडमध्ये सुधारणा होईल, असा तर्क या व्हायरल होत असलेल्या कात्रणात देण्यात आलेला आहे.

 

काय आहे सत्य?
वृत्तपत्राच्या कात्रणात वृत्ताशिवाय तारीख वा नाव लिहिलेले नव्हते. परंतु माध्यमांत काम करणाऱ्यांना हे माहिती असते की, प्रत्येक वृत्तपत्राचा एक विशिष्ट फाँट आणि लेआऊट असते. यावरूनच त्या वृत्तपत्राबाबत अंदाज केला जाऊ शकतो. असा फाँट आणि स्टाइल नवभारत टाइम्स म्हणजेच NBT वृत्तपत्राची आहे. क्रॉस चेक केले असता अंदाज खरा ठरला. एनबीटीच्या 2 मार्चच्या दिल्ली आवृत्तीत हे वृत्त सर्वात वर छापण्यात आले होते. जे व्हॉट्सअॅपपासून सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले. परंतु वृत्तपत्रात खाली लिहिण्यात आले होते की, "बुरा ना मानो होली है" म्हणजेच होळीदरम्यान गंमत म्हणून हे वृत्त छापण्यात आले होते. यामुळे व्हायरल होत असलेले हे वृत्त पूर्णपणे खोटे आहे, हे सिद्ध होते.

बातम्या आणखी आहेत...