आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • एकाच मांडवात नातू बाप आजोबा तिघांनीही उरकले लग्न, मन सुन्न करणारे आहे कारण... Grandfather And Father Accompanied By Grandson

एकाच मांडवात नातू-बाप-आजोबा तिघांनीही उरकले लग्न, मन सुन्न करणारे आहे कारण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुजरातच्या सुरतमध्ये रविवारी तिन्ही पिढ्यांनी एकत्र लग्न उरकले. यात आजोबा, वडील आणि नातवाने एकत्र लग्न केले आहे. - Divya Marathi
गुजरातच्या सुरतमध्ये रविवारी तिन्ही पिढ्यांनी एकत्र लग्न उरकले. यात आजोबा, वडील आणि नातवाने एकत्र लग्न केले आहे.

सुरत - गुजरातच्या सुरतमध्ये रविवारी तिन्ही पिढ्यांनी एकत्र लग्न उरकले. यात आजोबा, वडील आणि नातवाने एकत्र लग्न केले आहे. त्यांचे लग्न एका सामूहिक विवाह सोहळ्यात झाले. येथे 51 जोडपी लग्नगाठीत अडकली. पैकी 30 जोडपी तर अशी होती, जी 30 वर्षांपासून पती-पत्नी बनून एकत्र लिव्ह इनमध्ये राहत होती, परंतु लग्न केलेले नव्हते. येथील वासुर्णा गावात 72 वर्षीय बुजुर्ग महेंद्र पाडवी यांनी पत्नी ईलासोबत 50 वर्षांनंतर पुन्हा सप्तपदी घेतली. लग्नमंडपात महेंद्र यांचा मुलगा सुरेंद्र आणि नातू राजेंद्र यांचेही लग्न उरकले. एकाच मांडवात नातू आणि त्याच्या नवरीसोबत आजोबा-आजी आणि आई-वडीलही उपस्थित होते. 

 

एकत्र लग्न कारण्याचे असे आहे कारण..
- 72 वर्षे वयात नवरदेव बनलेले महेंद्र पाडवी म्हणाले की, खर्च पेलवणार नाही म्हणून ईलाशी माझे लग्न लावण्यात आले नव्हते.
- हिंदू रीतिरिवाजाने लग्न न झाल्याने तेव्हा फक्त नारळ आणि सव्वा रुपया देऊन माझ्या सासऱ्याने आपल्या मुलीची पाठवणी केली होती. ते म्हणाले की, तेव्हा लग्नामुळे वऱ्हाडांसाठी जेवण, मंडप इत्यादींवर बराच खर्च होणार होता.
- यामुळे आमच्या पूर्वजांनी अनेक वर्षांपूर्वी सव्वा रुपयात मुलगी देण्याची परंपरा आणली होती.

 

सव्वा रुपयात लेक चालली सासरला...
- डांग जिल्ह्यात बहुतांश वस्ती आदिवासी समाजाची आहे. भिल्ल, पाडवी, गावित आणि चौधरी समाजाचे लोक येथे कैक शतकांपासून राहत आले आहेत.
- हे आदिवासी जंगली वनस्पती आणि थोड्याशा सुपीक जमीन शेती करून उदरनिर्वाह करतात. प्रचंड गरिबीमुळे बहुतांश लोक लग्न करू शकत नाहीत.
- लग्नाच्या नावावर ना बँडबाजा, ना वरात; मुलीचे वडील वराला केवळ सव्वा रुपया आणि श्रीफळ देऊन आपली मुलगी देऊन निरोप देतात.
- येथील 100 हून जास्त गावांत काही दशकांपासून ही परंपरा चालत आली आहे. यानंतर नवदांपत्याचा संसार सुरू होतो.
- तथापि, आता काही समाजसेवी संस्था येथे सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन करू लागल्या आहेत. तेजस्विनी संस्कृती परिवार नावाच्या संस्थेने रविवारी सामूहिक विवाहाचे आयोजन केले.

 

3 वर्षांत 200 आदिवासी दांपत्यांचे लावले लग्न
- तेजस्विनी संस्कृती परिवारच्या प्रमुख आणि सामूहिक विवाहाचे आयोजन करणाऱ्या हेतल म्हणाल्या की, डांग जिल्ह्यातील लोक अनेक वर्षांपासून बिनालग्नाचे एकत्र राहत आले आहेत.
- 'तुम्ही याला लिव्ह इन रिलेशनशिपही म्हणू शकता. याला धार्मिक मान्यता मिळत नाही. सरकारही अशा लग्नाला मान्यता देत नाही, यामुळे आम्ही या लोकांचे लग्न लावण्याचा निर्णय घेतला.'
- संस्कृति परिवाराने 3 वर्षांत तब्बल 200 हून अधिक दांपत्याचे लग्न लावले आहे.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, या विवाह सोहळ्यातील आणखी फोटोज... 

बातम्या आणखी आहेत...