आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • नवरी वाट पाहत होती, प्रियकराची वरात आलीच नाही; वडील म्हणाले मुलीच्या हट्टासाठी शेतजमीनही विकली Groom Didnt Came On Marriage Day

नवरी वाट पाहत होती, प्रियकराची वरात आलीच नाही; वडील म्हणाले- मुलीच्या हट्टासाठी शेतजमीनही विकली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कानपूर (यूपी) - मुलीचा हट्ट पूर्ण करण्यासाठी एका वडिलांनी आपली वडिलोपार्जित जमीन विकून तिच्या लग्नाची तयारी केली. कानपूर मधील सर्वात आलिशान रिसॉर्ट बुक केले. शेकडो वऱ्हाडींसाठी सुविधा ठेवली. शुक्रवारी वऱ्हाड येणार होते. नवरी आणि कुटुंबीय वऱ्हाडाची वाट पाहत होते. अख्खी रात्र गेली, पण वऱ्हाड आले नाही. यामुळे नवरी एवढी दु:खी झाली आहे की, आत्महत्या करायची म्हणतेय. वास्तविक, मुलगा-मुलगी लहानपणापासून एकमेकांना ओळखत होते. मुलीच्या वडिलांनी आरोप केला की, लग्नाच्या दोन दिवसआधी हुंड्यात 5 लाख रुपयांची मागणी केली जात होती.

 

असे आहे प्रकरण

- अकबरपूर परिसरातील रहिवासी शिवलाल (बदललेले नाव) शेती करतात. त्यांना एक मुलगा व मुलगी आहे.

- सूत्रांनुसार, संजना (बदललेले नाव) आणि भानुप्रताप यांनी कोर्ट मॅरेज केलेले आहे. दोघेही 10 वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. ते सोबतच शिकत होते. दोघांनाही लग्न करायचे होते, परंतु संजनाचे वडील त्याविरुद्ध होते.
- भानुप्रताप मुलीच्या वडिलांची समजूत घालण्यात यशस्वी ठरला. लग्नाची तारीखही ठरली. परंतु दोन दिवसांपूर्वी मुलाकडच्यांनी नजराणा म्हणून 51 हजार रुपये, तर 5 लाख कॅश आणि एक बाइक हुंड्यात मागितली.
- नवरी म्हणाली की, भानुप्रताप तिच्या भावाचा मित्र होता. घरी नेहमी त्याचे येणेजाणे होते. सोबत शिकताना हळूहळू मैत्री प्रेमात बदलली. यानंतर दोघांनी लपून कोर्ट मॅरेज केले. दुसरीकडे, भानुनेही आपल्या घरच्यांना या लग्नासाठी तयार केले होते.

 

'हुंड्यासाठी वडिलोपार्जित जमीनही विकली'
- नवरी म्हणाली, 'भानूने आपल्या वडिलांना तयार तर केले, परंतु त्यांनी मोठा हुंडा मागितला. माझ्या वडिलांची एवढी कुवत नव्हती की, हुंड्याची सर्व रक्कम देऊ शकतील.'
- 'परंतु त्यांनी माझा हट्ट पूर्ण करण्यासाठी आमची जमीनही विकली. सर्वात चांगल्या रिसॉर्टमध्ये लग्न ठरवले. मला माहिती नव्हते की, मी ज्याच्यावर एवढे प्रेम केले, तोच माझे आयुष्य बरबदार करेल.'
- 'रात्री उशिरापर्यंत वऱ्हाड आले नाही म्हणून मी भानूला फोन लावला. परंतु त्याच्यासोबतच त्याच्या अख्ख्या घरातल्यांचे फोन बंद येत होते. त्याच्या घरी गेलो, तेव्हा तेथे कुलूप लागलेले होते. मला जर आता न्याय मिळाला नाही, तर माझ्यापुढे आत्महत्येशिवाय पर्याय नाही. माझ्या कुटुंबाचा मोठा अपमान झाला आहे.'
- तथापि, अद्यापही वधुपक्षाकडून पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. मुलीचे वडील म्हणाले, सध्या संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहोत, जर ते ऐकले नाहीत, तर पोलिसांत जावेच लागेल. 

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी Photos... 

बातम्या आणखी आहेत...