आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • भरधाव ट्रकची वऱ्हाडाच्या ट्रॅक्टरला धडक, भीषण अपघातात 2 जण ठार, 26 जखमी Groom Family Vehicle Meet Accident 2 Death Many Injured Near Radhanpur

Accident: भरधाव ट्रकची वऱ्हाडाच्या ट्रॅक्टरला धडक, भीषण अपघातात 2 जण ठार, 26 जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राघनपूर (गुजरात) - येथे जेतलपुरा आणि धारवडी गावादरम्यान वऱ्हाडाच्या ट्रॅक्टरला भरधाव ट्रकची धडक बसली. या भीषण अपघातात 2 जण जागीच ठार झाले, तर 26 वऱ्हाडी जखमी झाले. मृतांमध्ये एक मुलगाही सामील आहे. वऱ्हाड अमीरपुरा गावातील असून जामपुराला जात होते. 

 

ट्रॅक्टरला ट्रेलरने पाठीमागून मारली धडक…
वऱ्हाडींनी खचाखच भरलेल्या ट्रॅक्टरला ट्रकने पाठीमागून धडक मारली. यामुळे ट्रॅक्टरचे संतुलन ढळले. यात 1 लहान मुलासह 2 जण जागीच ठार आहे. सर्व 26 जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळावर लोकांची मोठी गर्दी जमा झाली होती. गावकऱ्यांनी पोलिस पोहोचण्याआधीच मदतकार्याला सुरुवात केली होती. अपघातामुळे हायवेवर वाहनांची मोठी रांग लागली आहे. पोलिसांनी पोहोचून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. 

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, या भीषण अपघाताचे आणखी Photos...  

बातम्या आणखी आहेत...