आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघातात आई-वडील व बहिणीसह 30 व-हाडी ठार; नवरदेवापासून लपववून ठेवली बातमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भावसागर- गुजरातमधील भावनगर येथे मंगळवारी सकाळी वऱ्हाडी मंडळींना घेऊन जाणारा ट्रक सकाळी पुलावरून खाली कोसळून ३० जण ठार झाले. या अपघातात जखमी झालेल्यांमध्ये १० जणांची प्रकृती गंभीर आहे. मृतांत नवरदेवाचे आई-वडील, बहिणीसह बहुतांश महिला व लहान मुले आहेत. दरम्‍यान लग्‍न होईपर्यंत सदर अपघाताची बातमी नवरदेवा पासून लपवून ठेवण्‍यात आली होती. 

 

मिळालेल्‍या माहिती नुसार, भावनगर येथील विजयचे मंगळवारी लग्‍न होते. विजय हा कारने तर व-हाडी मंडळी हे ट्रक ने लग्‍नाच्‍या गावाला निघाले होते. मात्र रस्‍त्‍यात झालेल्‍या ट्रक अपघातात नवरदेवाच्‍या आई-वडीलांसह 32 व-हाडी ठार झाले. नवरदेवापासून अपघताची माहिती लपवून ठेवत नातेवाईकांनी लग्‍न उरकून घेतले. नवरदेवाने त्‍यांच्‍या आई-वडीलांबद्दल विचारले असता, नातेबाईक त्‍याला सांगितले की, रस्‍त्‍यात ट्रक खराब झाला आहे, त्‍यांना उशीर  होणार आहे. लग्‍न झाल्‍यानंतर विजयला या अपघताची माहिती देण्‍यात आली. नातेवाईकांचे म्‍हणने होते की, आगोदी जर विजयला अपघाताची माहिती दिली असती तर त्‍याला धक्‍का बसला असता. लग्‍नानंतर विजयला सरळ रुग्‍णालयात घेऊन जाण्‍यात आले. 

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, लग्‍नाचे आणि अपघाताचे फोटो व व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...