आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Scandal: ब्युटी पार्लरमध्ये सेक्स रॅकेटचा भांडाफोड; फॉरेनच्या 5 तरुणींसह 15 जणांना अटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुडगाव - शहरातील सेक्टर 29 भागात ब्युटी पार्लर आणि स्पामध्ये सेक्स रॅकेटचा भांडाफोड करण्यात आला आहे. पोलिसांनी या स्पामधून एकूण 15 जणांना अटक केली. त्यामध्ये 5 तरुणी ह्या थायलंडच्या आहेत. तर उर्वरीत मनीपूर आणि स्थानिक मुली आहेत. अटक झालेल्यांमध्ये 2 ग्राहकांसह 4 पुरुषांचा सुद्धा समावेश आहे. गुडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात नव्याने नियुक्त झालेले पोलिस आयुक्त के.के. राव यांना ब्युटी पार्लरमध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यांच्याच आदेशानुसार, ही धाड टाकण्यात आली आहे. 


मालक फरार, व्यवस्थापकाला अटक
पोलिसांच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, पार्लरचा मालक युधवीर सिंग घटनास्थळावरून फरार झाला आहे. त्याचा कसून शोध घेतला जात आहे. त्याच्या विरोधात भारतीय दंड विधान आणि देहविक्रयाशी संबंधित फॉरेनर्स अॅक्ट अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी धाड टाकली त्यावेळी व्यवस्थापक उपस्थित होता. त्याला इतरांसोबत अटक केली आहे. यासोबतच, अटक करण्यात आलेल्या परदेशी तरुणी भारतात कोणत्या व्हिसावर राहत होत्या आणि इतर बाबींची चौकशी केली जात आहे. परिसरातच असलेल्या इतर दोन नाइटक्लबवर सुद्धा पोलिसांनी याचवेळी धाड टाकली. तेथूनही 2 महिलांसह 7 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात अनैतिक कृत्यांचे आरोप लावण्यात आले आहेत. 

बातम्या आणखी आहेत...