आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • हाफिज सईदच्या अटकेसाठी आम्ही बक्षीस ठेवले अन् तो पाकमध्ये खुलेआम फिरत आहे: अमेरिका Hafiz Saeed Out In The Open Its Tremendous Concern To US Says State Department

हाफिज सईदच्या अटकेसाठी आम्ही बक्षीस ठेवले अन् तो पाकमध्ये खुलेआम फिरत आहे: अमेरिका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
- पाक दहशतवाद्यांनी 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईच्या ताज हॉटेल आणि इतर काही जागांवर हल्ला केला होता, यात 166 जण दगावले
- हाफिजच्या डोक्यावर अमेरिकेने 1 कोटी डॉलरचे बक्षीस ठेवले, त्याविरुद्ध इंटरपोलची रेड कॉर्नर नोटीसही जारी झालेली आहे

 

वॉशिंग्टन - अमेरिकेने 26/11 मुंबई हल्ल्यातील मास्टरमाइंड हाफिज सईदला अटक न झाल्याने चिंता व्यक्त केली आहे. शुक्रवारी अमेरिकी परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, आमच्या सरकारने जमात-उद-दावाच्या प्रमुखावर बक्षीस ठेवले आहे आणि तो पाकिस्तान खुलेआम हिंडत आहे. हा अमेरिकेसाठी गंभीर चिंतेचा विषय आहे. विदेश विभागाचे प्रवक्ते हेथर नुअर्ट यांनी ही बाब मुंबई हल्ल्यावर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या वक्तव्यावर प्रश्न विचारल्यावर सांगितली. काही दिवसांपूर्वी शरीफ यांनी पहिल्यांदा एका इंटरव्ह्यूमध्ये कबूल केले की, मुंबई हल्ल्यात पाकिस्तानी दहशतवाद्यांचा हात होता.

 

मोदी सरकारशी अमेरिकेचे घनिष्ठ संबंध
- अमेरिकी सरकारचे प्रवक्ते म्हणाले, ''मोदी सरकारशी आमचे घनिष्ठ संबंध आहेत. भारतीय विदेश विभागातील सर्व जणांशीही चांगले संबंध आहेत. तो (हाफिज सईद) पाकिस्तानात खुलेआम फिरत आहे. हे अमेरिकेसाठी गंभीर चिंतेचे कारण आहे. आमच्या सरकारने त्याच्या अटकेसाठी बक्षीस ठेवलेले आहे.''

 

पाकिस्तानात अजूनही दहशतवादी संघटना सक्रिय: शरीफ
- 12 मे रोजी पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनला दिलेल्या मुलाखतीत नवाझ शरीफ म्हणाले होते, "पाकिस्तानात अजूनही दहशतवादी संघटना सक्रिय आहेत. आम्ही कसे काय त्यांना सीमा पार करून मुंबई शिरून 150 जणांना ठार करण्याचे आदेश देऊ शकतो? कोणी मला याचे उत्तर द्यावे? आपण तर खटलाही पूर्णपणे चालू देत नाहीत.'' तथापि, नुकतेच पाकने 26/11 के मुंबई हल्ल्यातील मुख्य वकील चौधरी अजहर यांना हटवले होते. 
- नवाझ म्हणाले, "जर तुम्ही एखादा देश चालवत असाल तर त्यासोबतच दोन वा तीन समांतर सरकारे चालवू शकत नाहीत. हे बंद करावे लागेल. तुम्ही संवैधानिक रीतीने फक्त एकच सरकार चालवू शकतात. मला माझ्याच लोकांनी सत्तेतून बेदखल केले. अनेक वेळा समझौते करूनही माझ्या विचारांना स्वीकारले गेले नाही. अफगाणिस्तानचे विचार यांना चालतो, पण आमचा नाही."

बातम्या आणखी आहेत...