- Marathi News
- Haryana Finance Minister Present Budget 2018 19 In Vidhan Sabha Live And Update
ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
खट्टर सरकारचा चौथा अर्थसंकल्प: अर्थमंत्री अभिमन्यू म्हणाले- हरियाणा आणि हरियाणवी भावनांचा समावेश
चंदीगड/पानीपत - अर्थमंत्री कॅप्टन अभिमन्यू यांनी मनोहर खट्टर सरकारचा चौथा अर्थसंकल्प शुक्रवारी हरियाणा विधानसभेत सादर केला. जीएसटी लागू झाल्यानंतर राज्याचे हे पहिले बजेट आहे. अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्री म्हणाले, हरियाणा आणि हरियाणवी भावना लक्षात घेऊन अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे. वर्ष 2018-19 साठी 1 लाख 15 हजार 198.29 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. गेल्या वर्षाच्या (2017-18) तुलनेत 12.6 टक्क्यांनी हा अधिक आहे.