आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Love Affair मुळे जजनी स्वत:च्या मुलीला डांबले घरात, हायकोर्ट म्हणाले तुमच्यासारखे जज आमच्यात असल्याची शरम वाटते HC Slams Judge For Hostaging Own Daughter In House Because Of Her Affair With Lawyer

Love Affair मुळे जजने स्वत:च्या मुलीला डांबले घरात, हायकोर्ट म्हणाले- तुमच्यासारखे जज आमच्यात असल्याची शरम वाटते

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा (बिहार) - येथे एका जिल्हा न्यायाधीशांनी आपल्या मुलीचा घरात डांबले. कारण ती एका वकिलावर प्रेम करत होती. जज असलेल्या वडिलांनी यावरून नाराज होऊन आपल्याच मुलीच घरात कैद करून ठेवले आहे. पाटणा हायकोर्टात हे प्रकरण आल्यावर त्यांनी न्यायाधीशांवर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. कोर्ट म्हणाले की, तुमच्यासारखे जज आमच्यात असल्याची आम्हाला लाज वाटते. जजवर ताशेरे ओढून कोर्टाने एसएसपींना आदेश दिले की, मंगळवारी (26 जून) कैदीतील मुलीला (24) मुख्य न्यायाधीशांसमोर सादर केले जावे.

 

कोर्टाने दिले आदेश

एका रिपोर्टनुसार, सोमवारी मुख्य न्यायाधीश राजेंद्र मेनन आणि न्यायाधीश राजीव रंजन प्रसाद यांच्या खंडपीठाने एका साइटवर प्रकाशित वृत्तानुसार स्वत:हून प्रकरणाची दखल घेत सुनावणी केली. कोर्टाने याप्रकरणी निर्देश दिले की, पीडितला पाटणाला आणण्यासाठी एसएसपींसोबत दोन महिला कर्मचाऱ्यांनी जावे. याशिवाय गरज भासल्यास कुटुंबीयांनाही कोर्टापुढे हजर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

 

स्वत:हून कोर्टाने घेतली दखल
वास्तविक, वडिलांनी आपल्या मुलीला कैदेत ठेवल्याचे वृत्त एका न्यूज वेबसाइटवर प्रकाशित झाले होते. कोर्टाने त्याची स्वत:हून दखल घेत सोमवारी प्रकरणाच्या सुनावणीसाठी दिवस निश्चित केला होता. जज सुभाषचंद्र चौरसिया यांची कन्या लॉचे शिक्षण घेते. सन 2012 पासून तिचे सुप्रीम कोर्टातील वकील सिद्धार्थ बन्सलशी प्रेमप्रकरण सुरू आहे. जज असलेल्या वडिलांना याबाबत माहिती नव्हती, परंतु जेव्हा त्यांना ही माहिती मिळाली त्यांनी मुलीला घरातच कैदेत ठेवले.

 

प्रियकर वकिलाने केली होती डीजीपींना विनंती

बन्सल यांनी याप्रकरणी डीजीपी के.एस. द्विवेदी यांना मदतीची विनंती केली. डीजीपींनी खगडिया एसपींना उचित कारवाईचे निर्देश दिले होते, परंतु काहीही होऊ शकले नाही. खगडिया पोलिस अधिकारी मीनू कुमारी यासाठी जजच्या घरी गेले होते, येथे त्यांनी पीडितेच्या डोळ्यावरील जखमेवर बर्फ लावला होता. 

 

 

बातम्या आणखी आहेत...