आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चारा घोटाळा : झारखंड हायकोर्टाने फेटाळला लालुंचा जामीन अर्ज, पुढील सुनावणी 4 मे रोजी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चाईबासा ट्रेझरीहून अवैधरित्या रक्कम उचलल्या प्रकरणी लालू यादव यांना 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.-फाइल - Divya Marathi
चाईबासा ट्रेझरीहून अवैधरित्या रक्कम उचलल्या प्रकरणी लालू यादव यांना 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.-फाइल

रांची - चारा घोटाळ्यातील चाइबासा ट्रेजरी केसमध्ये लालू यादन यांचा जामीन अर्ज झारखंड हायकोर्टाने फेटाळला आहे. त्यांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी झाली. कोर्टाने एम्स आणि रिम्सच्या रिपोर्टवर उत्तर मागवले आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 4 मे रोजी होणार होणार आहे. चाइबासाच्या पूर्वी पहिल्या आणि दुसऱ्या प्रकरणात कोर्टाने लालुंना 5-5 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. 23 फेब्रुवारीला हायकोर्टाने देवघर केसमध्ये लालुंचा जामीन अर्ज फेटाळला होता. काही दिवसांपूर्वी लालुंना उपचारासाठी बिरसा मुंडा तुरुंगातून दिल्लीच्या एम्सला हलवण्यात आले होते. 


जामीन मिळाला तरी तुरुंगातून बाहेर येणे कठीण 
- चाइबासा ट्रेझरीतील अवैध रक्कम उचलल्याप्रकरणी स्पेशल जज एसएस प्रसाद यांच्या कोर्टाने लालू यांना 5 वर्षांची शिक्षा सुनावली होती. लालूंकडून हायकोर्टात जामीनअर्ज दाखल करण्यात आला होता. 
- कायदेतज्ज्ञांच्या माहितीनुसार, जर या केसमध्ये लालुंना जामीन मिळाला तरी त्यांना तुरुंगातच राहावे लागेल. कारण दुमका ट्रेजरी आणि इतर प्रकरणांतील शिक्षा त्यांना भोगावी लागेल. 

 

23 डिसेंबरपासून कैदेत 
23 डिसेंबर 2017 ला देवघर ट्रेझरी प्रकरणामध्ये कोर्टाने लालुंसह 16 आरोपींना दोषी ठरवले होते. त्याच दिवसांपासून लालू रांचीमधील बिरसा मुंडा मध्यवर्ती कारागृहात आहेत. त्यानंतर देवघर केसमध्ये लालुंना साडेतीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी त्यांना दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. 


लालुंना 6 पैकी या 4 प्रकरणांत शिक्षा 
1) चाइबासा ट्रेझरीचे पहिले प्रकरण : 30 सप्टेंबर 2013 ला कोर्टाने लालुंना दोषी ठरवले. पाच वर्षांची शिक्षा आणि 25 लाखांचा दंड 
ठोठावण्यात आला. 
2) देवघर ट्रेझरी केस : 23 डिसेंबर 2017 ला दोषी ठरवले. 6 जानेवारी 2018 ला लालुंसह 16 आरोपींना साडे तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. लालुंवर 10 लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला. 
3) चाइबासा ट्रेझरी दुसरे प्रकरण : 24 जानेवारी 2018 ला लालुंना दोषी ठरवण्यात आले. याच दिवशी त्यांना 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. दहा लाखांचा दंड ठोठावण्यात आला. 
4) दुमका ट्रेझरी केस : मार्च 2018 मध्ये लालू यादवला दोषी ठरवण्यात आले. माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्र यांची सुटका झाली होती. 24 मार्चला लालू यांना 7-7 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. दोन्ही शिक्षा वेगळ्या असतील. म्हणजे एकूण 14 वर्षांची शिक्षा असेल. लालूंवर 60 लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. 


या दोन प्रकरणांत सुनावणी सुरू 
5) डोरंडा ट्रेझरी केस : सुनावणी सुरू आहे. 
6) भागलपूर ट्रेझरी केस : याची सुनावणी पाटणा सीबीआय कोर्टात सुरू आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...