आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • पुढील 24 तासांत देशभरात जोरदार पावसाची शक्‍यता, Heavy To Very Heavy Rains Likely In Nine UP Districts

24 तासांत मुंबईसह देशभरात जोरदार पावसाची शक्‍यता, UP तील 16 जिल्‍ह्यांना वादळाचा इशारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/दिल्ली/लखनऊ- पुढील 24 तासांत देशातील 22 राज्‍यांत जोरदार पावसाची शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तर येत्‍या काही तासांत उत्‍तर प्रदेशातील 16 जिल्‍ह्यांना वादळी पाऊस बरसण्‍याची शक्‍यता आहे. याविषयी प्रशासनाने अलर्ट जारी केला आहे.


हवामान विभागानुसार, महाराष्ट्र, ओरिसा, उत्‍तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, जम्मू-कश्मीर, राजस्थान, छत्तीसगड, कर्नाटक, अरुणाचल प्रदेश, अासाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, पश्चिम बंगाल, सिक्किम, झारखंड, उत्तराखंड, हरियाणा, दिल्ली, पंजाब, मध्य प्रदेश, गुजरात, आंध्रप्रदेश, तेलंगना आणि केरळमध्‍ये या राज्‍यांत पुढील 24 तासांत जोरदार पावसाची शक्‍यता आहे. 


उत्‍तर प्रदेशच्‍या 9 जिल्‍ह्यांना वादळाचा इशारा
पुढील काही तासांत उत्‍तर प्रदेशच्‍या मथुरा, अलीगड, हाथरस, लखीमपुरखीरी, सीतापूर, शाहजहांपुर, जालौन, इटावा, औरैया, गोंडा, बस्ती, फैजाबाद, आंबेडकर नगर, सिद्धार्थनगर, बलरामपूर आणि सुल्तानपूर या 9 जिल्‍ह्यात वादळासह पावसाची शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तसेच श्रावस्ती, खीरी, पीलीभीत, बरेली, रामपूर, शाहजहांपूर, मुरादाबाद आणि बिजनौर या जिल्‍ह्यातली जोरदार सरी बरसण्‍याची शक्‍यता आहे. 


48 तासांत उत्‍तर भारतातील 6 राज्‍यांना मान्‍सून व्‍यापणार
दक्षिण-पश्चिम मान्‍सून राजस्‍थानपर्यंत आला आहे. पुढील 48 तासांत मान्‍सून पुर्ण राजस्‍थानला व्‍यापून घेईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मान्‍सून उत्‍तरेकडे सरकण्‍यासाठी स्थिती अनुकूल असल्‍याचे हवामान विभागाने सांगितले आहे. आणि पुढील 48 तासांत तो ऊत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल, पंजाब, हरियाणा आणि दिल्लीपर्यंत पोहोचण्‍याची शक्‍यता आहे.   

 

 

 

बातम्या आणखी आहेत...