आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Hemkund Saheb's Darshan Is Coming From A Slippery Road At A Height Of 15 Thousand Feet

15 हजार फूट उंचीवर हेमकुंड साहेबच्या दर्शनास निसरड्या रस्त्यावरून येत आहेत भाविक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोहाल -  उत्तराखंडातील गुरुद्वारा श्री हेमकुंडसाहेबच्या संगतमध्ये सहभागी होण्यासाठी २५ मेपासून यात्रेस सुरुवात झाली आहे. हा गुरुद्वारा १५ हजारांहून अधिक फुटांपेक्षा उंच हिमालयाच्या डोंगरावर आहे. बर्फ साचल्यामुळे  रस्ता निसरडा झालेला आहे. परंतु भाविकांचा उत्साह जराही कमी झालेला नाही. पहिल्याच दिवशी ४ हजारांहून अधिक भाविक येथे दाखल झाले आणि त्यांनी दर्शन घेतले. जथ्थेदार येथील सुमारे १५ हजार फूट उंचीवर सात डोंगरांत असलेल्या गुरुद्वारात दर्शनासाठी येत आहेत. यात्रेकरूंच्या मदतीसाठी तैनात असलेले लष्कराचे जवान त्यांना मदत करत आहेत. ही यात्रा १० ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. त्यानंतर बर्फवृष्टी सुरू होत असल्याने गुरुद्वाराचे दरवाजे बंद केले जातात. येथे दर्शनासाठी देश-विदेशातून भाविक मोठ्या संख्येने दाखल होतात. 

 

६ किमी उंचीवर पायी जावे लागते

गुरुद्वारा गाेविंदधामपासून गुरुद्वारा श्री हेमकुंडसाहेबपर्यंत ६ किमीची यात्रा  यात्रेकरूंना पायी चालत जाऊन पार पाडावी लागते. त्यानंतर तीन किमीपर्यंत हिमनदी व थंड वाऱ्याचा झोत सहन करत संगत गुरुदर्शनासाठी दाखल होत आहे. येथे अाधीच खूप बर्फवृष्टी झालेली आहे.   

 

संगतसाठी दिली जाते दररोज मदत : गुरुद्वारा 

श्री हेमकुंडसाहेब व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष नरिंदरपालसिंह बिंद्रा यांनी सांगितले, यात्रेत येणाऱ्या संगतच्या मदतीसाठी वैद्यकीय सुविधा व लंगरसह सर्व प्रकारची सुविधा करण्यात आली आहे. यात्रेच्या पहिल्याच दिवशी ४ हजारांहून अधिक संगतनी दर्शन घेतले. आता दररोज संगत येते आहे.

बातम्या आणखी आहेत...