आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • गंगेत वॉटर स्पोर्ट्सवर तात्पुरती स्थगिती High Court Bans All Water Sports In Uttarakhand

गंगेतील वॉटर स्पोर्टस आणि पॅराग्लायडिंगवर उत्तराखंड हायकोर्टकडून बंदी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डेहरादून - उत्तराखंड हायकोर्टाने गंगा वॉटर स्पोर्ट्स आणि इतर ठिकाणांवर पॅराग्लायडिंगवर तात्पुरती स्थगिती जारी केली आहे. एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना शुक्रवारी हायकोर्ट म्हणाले, अॅडव्हेंचर स्पोर्ट्ससाठी उत्तराखंड सरकारने दोन आठवड्यात स्पष्ट आणि पारदर्शी योजना तयार करावी. योजना तयार होई पर्यंत अशा प्रकारचे स्पोर्ट्स येथे होऊ नयेत. 

ऋषिकेश येथील रहिवासी हरिओम कश्यप यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. त्यामध्ये त्यांनी गंगेत सुरु असलेल्या अॅडव्हेंचर स्पोर्ट्सवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. याचिकेत म्हटले आहे की खासगी कंपनी आणि उद्योगपतींनी गंगेच्या किनाऱ्यावर कब्जा करुन तिथे आपली कार्यालये थाटली आहेत. येथे त्यांनी अवैध रित्या रिव्हर राफ्टिंग आणि इतर वॉटर स्पोर्ट्स सुरु केले आहेत. नदीच्या किनाऱ्यावर कँप लावले जात आहेत. त्यामुळे प्रदुषण वाढले आहे. गंगेचे पाणी अशुद्ध होत आहे. सध्या हे थांबवण्यासाठी राज्य सरकारकडे कोणतीही पॉलिसी नाही. 
या प्रकरणावर उत्तराखंड हायकोर्टच्या डिव्हिजनल बेंचचे जस्टिस राजीव शर्मा आणि जस्टिस लोकपाल सिंह यांनी सुनावणी केली.

बातम्या आणखी आहेत...