आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • High Tension Electric Wire Touches Passenger Bus Set On Fire In Jharkhand, One Killed, Six Injured

हायटेन्शन तारेमुळे धावत्या बसला भीषण आग, होरपळून निघाले प्रवासी, एक जण ठार, 6 गंभीर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकुड़ (झारखंड) - अमड़ापाड़ा परिसरातील पोखरिया रोडवर एका प्रवासी बसला हायटेन्शन विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने धावत्या बसला भीषण आग लागली. या दुर्घटनेत प्रवासी होरपळले असून एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. या अग्निकांडात 4 जण गंभीर भाजले आहेत. अनेक तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर बसची आग विझविण्यात यश आले.

 

दुमकाला जात होती प्रवासी बस
कृष्णा रजत नावाची ही बस पाकुड़हून दुमकाला जात होती. बसमध्ये एकूण 50 प्रवासी स्वार होते. बसच्या छतावर अनेक सायकल्स लादलेल्या होत्या. बस पोखरिया रोडवर पोहोचताच, छतावरील सायकलचा उच्चदाबाच्या विद्युत वाहिनीशी संपर्क झाला. यामुळे पूर्ण बसमध्ये करंट पसरला. पाहता-पाहताच बसला भीषण आग लागली. या घटनेची माहिती मिळताच फायर बिग्रेड आणि पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवता आले. बसमध्ये स्वार अनेक प्रवाशांनाही उच्चविद्युत प्रवाहाचा झटका बसला.   

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, या अग्निकांडाचे आणखी काही Photos...

 

 

बातम्या आणखी आहेत...