आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

23 वर्षांची हिजाब गर्ल बनली बॉडीबिल्डर, व्हॉट्सअॅपवर फोटो पाहून केली तयारी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोच्ची - कोच्ची येथे झालेल्या बॉडीबिल्डिंग स्पर्धेत एका हिजाब गर्लने सर्वांनामागे टाकत चॅम्पियनशिपवर आपले नाव कोरले आहे. 23 वर्षांच्या मजीजिया भानू या मेडिकल स्टुडंटने मिळवलेले यश हे वेगळे ठरत आहे ते तिच्या प्रॅक्टिस तंत्रामुळे. व्हॉट्सअॅपवर फोटो पाहून मजीजियाने प्रॅक्टिस केली होती. 

 

असे मिळवले यश

हिजाब गर्ल मजीजिया भानूने बॉडीबिल्डिंग स्पर्धेत घवघवीत यश मिळवले आहे. 23 वर्षांच्या मजीजियाने केरळमधील कोच्ची येथे झालेल्या बॉडिबिल्डिंग स्पर्धेत हिजाबमध्ये आपले  कौशल्य दाखवले. मजीजिया ही कोझीकोड येथे मेडिकल स्टुडंट आहे. तिने सांगितले, की एक वर्षापेक्षा जास्त काळापासून ती वेटलिफ्टिंगचे ट्रेनिंग घेत होती. बॉडिबिल्डिंग हा तिचा कधीही प्रांत राहिलेला नाही. त्यासाठी तिने पावरलिफ्टिंग कोचकडे मदत मागितली होती. त्यांनी व्हॉट्सअॅपवर आपले काही फोटो मजीजियाला शेअर केले. ते फोटो पाहून तिने प्रॅक्टिस सुरु केली आणि या स्पर्धेत यश मिळवले आहे. 

 

- मजीजिया भानूने सांगितले की बॉडिबिल्डिंबद्दल याआधी फारसे माहित नव्हते, त्यामुळे स्पर्धेत भाग घेण्याचाही प्रश्न नव्हता. भावी पती आणि कुटुंबियांनी या चॅम्पियनशिपमध्ये भाग घेण्यासाठी भानूला प्रोत्साहित केले होते. 
- याआधी मजीजिया मागील वर्षी कोझीकोड येथे झालेल्या स्पर्धेत सर्वात शक्तीशाली महिलेचा किताब जिंकला होता. 
- स्पर्धेत मजीजियाने काळ्या रंगाचे कपडे परिधान करुन डोक्याला स्कार्फ बांधून आपल्या कसदार शरीराचे चार आसनांच्या माध्यमातून प्रदर्शन केले. अधिकचे वेळ न गमावता तिने जजेसना प्रभावित केले आणि फायनल राऊंडमध्ये एंट्री मिळवली होती. 

बातम्या आणखी आहेत...