आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारने आश्वासने पाळली नाहीत! पुरस्कार परत करणार पद्मश्री Hockey Legend च्या पत्नी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोहम्मद शाहिद यांच्या पत्नी परवीन शाहिद... - Divya Marathi
मोहम्मद शाहिद यांच्या पत्नी परवीन शाहिद...

स्पोर्ट्स डेस्क - 1980 च्या ऑलिंपिक्समध्ये भारतीय हॉकी संघाला गोल्ड मिळवून देणारे टीमचे सदस्य मोहम्मद शाहिद यांचे कुटुंब सर्वच पुरस्कार सरकारला परत करणार आहे. त्यांच्या पत्नी परवीन शाहिद यासाठी 21 जुलै रोजी दिल्लीला जाणार आहेत. हॉकीमध्ये केलेल्या अभूतपूर्व कामगिरीसाठी लेजंड मोहम्मद शाहिद यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आले होते. परंतु, सरकारने त्यांना दिलेली आश्वासने अद्याप पूर्ण केली नाहीत. त्यामुळेच आपल्या पतीचे पुरस्कार परत करणार असे परवीन यांनी मंगळवारी स्पष्ट केले आहे. 


मोहम्मद शाहिद यांची 20 जुलै रोजी दुसरी जयंती आहे. त्या निमित्त त्यांच्या विधवा परवीन दिल्ली गाठणार आहेत. त्या म्हणाल्या, "त्यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आले होते. ते एक गोल्ड मेडलिस्ट हॉकी प्लेअर होते. त्यांच्या नावाने एखादी टूर्नामेंटही होत नसेल. एखाद्या मैदानाला त्यांचे नाव दिले जात नसेल तर या पुरस्कारांचा काय उपयोग." दोन वर्षांपूर्वी जेव्हा शाहिद यांचे निधन झाले. तेव्हा उत्तर प्रदेश आणि केंद्र सरकारचे अनेक मंत्री घरी आले होते. कुटुंबियांचे सांत्वन करताना त्या मंत्र्यांनी मोठ-मोठी आश्वासने दिली होती. परंतु, ती आश्वासने फक्त नावापुरती राहिली आहेत अशी तक्रार परवीन यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...