आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
ऑटो डेस्क - जपानची ऑटो कंपनी होंडाची दुचाकी व चारचाकी वाहनांची मोठी रेंज बाजारात उपलब्ध आहे. यात स्कूटरपासून ते सुपर बाइकपर्यंत सर्वकाही आहे. स्कूटर अन् बाइकच्या कॉम्बिनेशनने तयार झालेली 'नवी'ही मार्केटमध्ये आहे. या कंपनीच्या अशाही अनेक स्कूटर आहेत, ज्या आतापर्यंत भारतात लाँच झालेल्या नाहीत. या स्कूटर पॉवरफुल इंजिनसोबतच हायटेक फीचर्सनी युक्त आहेत. यात कंपनीची एलिसीम (Elysium) स्कूटरही सामील आहे. ही कन्व्हर्टेबल स्कूटर आहे जी पूर्णपणे स्टायलिश आणि कम्फर्टेबल आहे.
# रूफसोबत येते स्कूटर
या स्कूटरमध्ये कन्व्हर्टेबल रूफ दिली जाते. जी ट्रान्सपरंट मटेरियलची आहे. म्हणजेच स्कूटर चालवणारे आणि मागे बसणारे पॅसेंजर्सला ऊन लागत नाही. या स्कूटरमध्ये 4 सिलिंडरचे 7-स्ट्रोक 750ccचे वॉटर-कूल्ड इंजिन देण्यात आले आहे. म्हणजेच याचे इंजिन टाटा नॅनोपेक्षाही जास्त पॉवरफुल आहे. नॅनोमध्ये 624cc पॉवरचे इंजिन देण्यात आले आहे. दुसरीकडे, मारुती अल्टोमध्ये 796cc चे इंजिन देण्यात आले आहे. म्हणजेच ही स्कूटर एखाद्या कारच्या बरोबरीने पॉवरफुल आहे. ही स्कूटर ऑटोमूटिक गिअर बॉक्ससोबत येते.
# पावरफुल फीचर्स
एलिसीम स्कूटरमध्ये ट्विन ब्रेक सिस्टिम देण्यात आली आहे. जी दोन्ही डिस्कसोबत येते. स्कूटरमध्ये मोनो शॉक, मोनो आर्म सस्पेंशन देण्यात आले आहे. तथापि, यात ABS नाही. 2001 मध्ये या स्कूटरची संकल्पना सादर करण्यात आली होती, दुसरीकडे पहिल्यांदा ऑक्टोबर 2003 मध्ये टोकियो मोटार शोदरम्यान शोकेस करण्यात आले होते. तथापि, या स्कूटरचे प्रॉडक्शन करण्यात आले नाही.
पुढच्या स्लाइडवर पाहा या स्कूटरचे आणखी फोटोज...
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.