आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेमसंबंधातून प्रियकराची हत्या, प्रेयसीने मृतदेहाजवळ बसून ढाळले अश्रू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ननीना(महेंद्रगड)- येथील रामबास गावात बुधवारी एका आकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली. यामागे ऑनर किलिंगचे कारण असल्याचे सांगण्यात येत आहे. इसराणा गावातील मृत तरूणाचे रामबास गावातील तरूणीशी प्रेमसंबंध होते, याच कारणावरून तरूणीच्या कुटुंबींयांनी तरूणाची हत्या केली. पोलिसांनी या प्रकऱणी केस दाखल केली आहे. तसेच, तरूणीला सेफ हाऊसला पाठवण्यात आले आहे.


असे आहे संपूर्ण प्रकरण...
- मृतक प्रदीप (19)चा भाउ रणबीरने सांगितले की, त्याचा भाऊ रामबास गावात सरकारी शाळेत 11वीत शिकत होता.
- बुधवारी साकाळी तो शाळेसाठी निघून गेला. तिथे रामबास गावातील तरूण गौरव, प्रदीपला बोलवून घेऊन गेला.
- त्यांनी प्रदीपला कपूरी गावीतील शेतात नेले. तेथे आधी अमित, राहुल व इतर तरूणांनी त्याला लाठ्या-काठ्यांनी मारहाण केली आणि नंतर त्याची हत्या केली.
- घटनास्थळाहून एख काढी जप्त करण्यात आली आहे.
- रणबीरने सांगितले की, मुलांकडून माहिती मिळाल्यानंतर मी घटनास्थळी पोहोचलो. परंतु, तोपर्यंत प्रदीपचा मृत्यू झाला होता.


पोलिस म्हणतात ऑनर किलिंग...
- तपास अधिकारी लाल सिंह यांनी सांगितले की, प्रकरण ऑनर किलिंगशी संबंधीत आहे. मृत प्रदीपचे रामबास गावातील एका तरूणीशी प्रेमसंबंध होते. यामुळे तरूणीच्या नातेवाईकांनी प्रदीपची हत्या केली आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाले. मृत प्रदीपजवळ एक तरूणी बसलेली होती. तिला पोलिसांनी सेफ हाउसला पाठवले आहे. या प्रकरणी केस दाखल करण्यात आली असून पोलिस तापास करत आहेत.


पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...