आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिमुरडीचा मृतदेह घेऊन विनंती करत फिरला, अॅम्ब्युलन्स द्यायला टाळाटाळ केल्याने बाईकवर नेले घरी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

छपरा - बिहारमधील छपरा येते सदर हॉस्पिटलमध्ये पाषाण हृदयी लोकांचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे. एका चिमुरडीच्या मृत्यूनंतर तिचे पार्थिव नेण्यासाठीही येथील कर्मचाऱ्यांनी अशीच टाळाटाळ केली आणि अखेर तिच्या कांकांनी मित्राच्या बाईकवर बसून खांद्यावर टाकून तिचा मृतदेह घरू नेला. शहरातील नव्याने तयार करण्यात आलेल्या शौचालयाच्या टाकित बुडून या चिमुरडीचा मृत्यू झाला होता. 


कर्मचाऱ्यांची टाळाटाळ 
1. चिमुरडीचा मृतदेह घेऊन तिचे काका रुग्णालय परिसरात कर्मचाऱ्यांकडे अॅम्ब्युलन्ससाठी वारंवार विचारणा करत राहिला. पण सर्वांनी त्याची टाळाटाळ केली. 
2. अॅम्ब्युलन्स वाल्यांनीही त्याचे म्हणणे ऐकले नाही. तो वारंवार मृतदेह नेण्याची विनंती करत राहिला पण कोणीही ऐकले नाही. कोणी त्याला मदत केली नाही. 
3. अखेर काहीही मार्ग न राहिल्याने त्यांनी फोन करून मित्राला बाईक मागवली. त्यानंतर बाईकवरच त्याने मृतदेह घरी नेला. 

बातम्या आणखी आहेत...