आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • मोठी बातमी: निपाह व्हायरसवर नाही कोणताही उपचार, या 5 प्रकारे सावधगिरी बाळगल्यास होईल बचाव How To Prevent Nipah Virus: You Should Know About It

निपाह व्हायरसवर नाही कोणताही उपचार, या 5 प्रकारे सावधगिरी बाळगल्यास होईल बचाव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पेशल डेस्क - निपाह व्हायरसमुळे आतापर्यंत 9 जणांचा बळी गेला आहे. राज्य सरकारने हा सर्वात वेगाने पसरणारा व्हायरस असल्याचे म्हटले आहे. सरकारने या व्हायरसशी लढण्यासाठी 20 लाख रुपयांचा आपत्कालीन निधीही कोझिकोड मेडिकल कॉलेजला दिला आहे. यामुळे या ज्वरापासून काही प्रमाणात दिलासा देण्यास मदत होईल.

> जागतिक आरोग्य संघटने (WHO) नुसार या व्हायरससाठी अद्याप अशी कोणतीही लस उपलब्ध झालेली नाही, जी मनुष्य आणि प्राण्यांना देता येऊ शकेल. NiV ने संक्रमित रुग्णाची फक्त काळजी घेतली जाऊ शकते. श्री गंगाराम हॉस्पिटलच्या मेडिसिन डिपार्टमेंटचे सीनियर कन्सल्टंट अतुल गोगिया म्हणाले, या व्हायरसचे संक्रमण इतर व्हायरल इन्फेक्शनप्रमाणेच आहे. यामुळे श्वसनसंस्था आणि सेंट्रल नर्व्हस सिस्टिम अफेक्ट होते. डॉक्टरच्या मते, या व्हायरसपासून बचाव करण्यासाठी डॉक्टर सपोर्टिव्ह केअर करू शकतात.

 

या व्हायरसने या देशांनाही केले हैराण
> बांग्लादेशात 2001 ते 2013 दरम्यान या व्हायरसने अनेक वेळा हल्ला केला आहे.  
> 2013 च्या ICMR रिसर्च पेपरनुसार हा व्हायरस कंबोडिया, थायलंड, इंडोनेशिया, साऊथ आफ्रिका आणि घाना, पश्चिम आफ्रिकामध्येही आढळलेला आहे. याचे कारण वटवाघळांनी कुरतडलेली फळेच होते.

 

यापूर्वीही आला होता भारतात
> भारतात हा व्हायरस 2001 मध्ये पश्चिम बंगालच्या सिलिगुड़ीमध्ये आढळला होता.
> यानंतर 2007 मध्ये पश्चिम बंगालमध्ये हा आढळला. शास्त्रज्ञांना आढळले की, पामवृक्षाची कच्ची फळे झाडावरून तोडून प्यायल्याने हा आजार संक्रमित होत आहे.

 

3 प्रकारे पसरतो हा व्हायरस
>> इंफेक्टेड वटवाघळाच्या संपर्कात आल्यावर.
>> इंफेक्टेड डुकराच्या संपर्कात आल्यावर.
>> व्हायरसमुळे इन्फेक्टेड पेशंटच्या संपर्कात आल्यावरही हा पसरतो.

 

असा पोहोचतो व्हायरस मानवापर्यंत
> निपाह व्हायरसने इन्फेक्टेड वटवाघळ वा इतर एखादा पक्षी एखाद्या फळावर चोच मारतो वा फळ कुरतडून खातो, तेव्हा हा व्हायरस त्या फळात येतो. हे फळ कोणतेही असू शकते.
> व्हायरस असलेले फळ मार्केटमधून तुमच्या घरापर्यंत पोहोचते. जर तुम्ही ते खाल्ले तुम्हीही निपाह व्हायरसची शिकार ठरू शकता.
> जर एखाद्या डुकरामध्ये हा व्हायरस असेल तर त्यामाध्यमातूनही हे इन्फेक्शन तुमच्यापर्यंत पोहोचू शकते.
> याशिवाय एखादी व्यक्ती जर या व्हायरसने ग्रस्त असेल आणि तुम्ही तिच्या संपर्कात आला, तर तुम्हीही त्याची शिकार ठराल.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या व्हायरसपासून वाचण्याच्या पद्धती... 

 

बातम्या आणखी आहेत...