आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • धक्कादायक: लग्नानंतर प्रियकराला भेटणे एका महिलेला महागात पडले Husband Caught Red Handed Married Women Meets Lover

लग्नानंतर प्रियकराला भेटणे पडले महागात, विवाहितेच्या पती-सासऱ्याने प्रियकराशी लावले दुसरे लग्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गया (बिहार) - लग्नानंतर प्रियकराला भेटणे एका महिलेला महागात पडले. गयामध्ये बुधवारी एका विवाहितेचे दुसरे लग्न तिचा प्रियकर पंकजशी खुद्द तिचा पती आणि सासऱ्याने लावले. प्राप्त माहितीनुसार, 2017 मध्ये पप्पू आणि करिश्माचे लग्न झाले होते. यादरम्यान तरुणीचे एकाशी अफेअर सुरू होते. याचा खुलासा मंगलवारी रात्री प्रियकर भेटायला तिच्या गावात आल्यावर झाला. गावकऱ्यांना या संबंधांची कुणकुण लागल्यावर त्यांनी प्रियकराला रंगेहाथ पकडून पोलिस आणि दोघांच्या घरच्यांना माहिती दिली.  

 

विवाहितेच्या चारित्र्यावर पती-सासऱ्याने घेतला संशय, घरात ठेवायला नकार
- विवाहिता आपल्या पतीसोबत राहत होती. मंगळवारी रात्री 10:00 वाजता प्रियकर आपल्या एका मित्रासोबत विवाहितेला पळवून नेण्याच्या उद्देशाने तेथे पोहोचला होता.
- घटनेमुळे नाराज विवाहितेचा सासरा व पती पप्पू यांनी तिच्या चारित्र्यावर आरोप करत तिला घरात ठेवण्यास नकार दिला. यानंतर पती व सासऱ्याने गावकऱ्यांसमोरच विवाहितेचे दुसरे लग्न पंकजशी लावले.

बातम्या आणखी आहेत...