आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • पत्नीला मित्रांसोबत शारीरिक संबंधांसाठी दबाव टाकायचा पती Husband Forced Wife For Swapping With Friends Shocking Crime News In Lucknow

पत्नीला मित्रांसोबत शारीरिक संबंधांसाठी दबाव टाकायचा पती, गुंडांकरवी झाडल्या 6 गोळ्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरोपी संजय केडिया व पीडित पत्नी मोनिका. - Divya Marathi
आरोपी संजय केडिया व पीडित पत्नी मोनिका.

लखनऊ - 06 मे, शनिवारी रात्री लिकर किंग संजय केडियाची पत्नी मोनिकाला गुंडांनी 6 गोळ्या घातल्या. तिने रक्तबंबाळ होऊनही कारमधून उतरून मदतीसाठी लिफ्ट मागितली. याप्रकरणी पोलिसांनी केडियाला अटक केली होती. सध्या तो जामिनावर बाहेर आहे आणि लखनऊ हायकोर्टात ही केस सुरू आहे. घटनेनंतर मोनिकाच्या कुटुंबीयांनी संजय केडियाबाबत धक्कादायक खुलासा केला. क्राइम सिरीजमध्ये DivyaMarathi.Com या आरोपी लिकर किंगची कहाणी सांगत आहे. 

 

बायकोच्या अदलाबदलाची होता खेळ, टाकायचा दबाव...
- बहीण मनीषा म्हणाली, एप्रिल 2016 मध्ये संजय आणि मोनिकाचे लग्न झाले. तो आपल्या मित्रांच्या कुटुंबीयांसोबत मोनिकाला बाहेर ट्रिपवर घेऊन जायचा. तेथे दारू प्यायल्यानंतर तिच्यावर वाइफ स्वॅपिंग (बायकांची अदलाबदली) चे प्रेशर टाकायचा. नकार दिल्यास बेदम मारहाण करायचा. आणि नशा उतरल्यावर माफीही मागायचा.
- या गोष्टी मोनिकाने आम्हाला कधी सांगितल्या नव्हत्या. पण जेव्हा दोघांमध्ये सारखे वाद होऊ लागले, तेव्हा तिने हे सर्व सांगितले. 
- लग्नाच्या एक-दोन महिन्यांपर्यंत सगळे काही ठीक राहिले, परंतु त्यानंतर परिस्थिती बिघडू लागली. संजय जेव्हा दारू पिऊन घरी यायचा तेव्हा त्याला वाटायचे की, मोनिकाने स्वत:च्या हाताने त्याचे बूट काढावेत. एवढेच नाही, तो रागाच्या भरात तिला लाथाही मारायचा. अनेकदा तिला दुखापत झाली होती.
- जेवणात काही आवडले नाही, तर थेट ताट उचलून मोनिकावर फेकायचा. गरम अन्न असल्याने अनेकदा मोनिका भाजली होती.
- मोनिकाचे वडील शत्रुसुधन सिंह म्हणाले की, त्याच्या पहिल्या लग्नापासून त्याला एक मुलगी आहे. येता-जाता तो मुलीला म्हणायचा की, तू माझ्यासाठी रखेल आहेस.
- लग्नानंतर दोघेही रेंटवर राहायचे. यानंतर सफेदाबादमध्ये शालीमार अपार्टमेंटमध्ये याने घर घेतले. पण ना तो मुलगी घेऊन गेला, ना आम्हाला बोलावले.
- यामुळे आम्हाला संशय आला, तेव्हा मुलीने सांगितले की, त्याचे आधीच लग्न झालेले आहे. नोव्हेंबर 2016 मध्ये आम्ही मुलीला आमच्या घरी बोलावले आणि तिला घटस्फोट देण्यासाठी सांगितले. परंतु संजयने ऐकले नाही.
- संजयनेच आमच्या मुलीवर हल्ला घडवला होता. तो तिला जिवे मारणार होता.

 

करंट स्टेटस...
DivyaMarathi.Com शी बोलताना मोनिकाचे वडील शत्रुसुधन सिंह म्हणाले, एक वर्ष झाले आहे, आतापर्यंत लखनऊ पोलिसांनी फरार असलेल्या दोन्ही शूटर्सना अटक केलेली नाही. अटक करण्याबद्दल अनेक वेळा पोलिसांना तक्रारही केली, परंतु काहीच सुनावणी झालेली नाही. मुख्य आरोपी संजय केडियाला जामीन मिळाल्यानंतर तो सातत्याने केस परत घेण्यासाठी दबाव टाकत आहे. तथापि, केडिया तब्बल 6 महिने तुरुंगात राहिला. परंतु शूटरची अटक न झाल्याने त्याला जामीन मिळाला आणि तो बाहेर आला. सध्या प्रकरण लखनऊ हायकोर्टात सुरू आहे.


असा श्रीमंत बनला केडिया... 
- दारूच्या एका व्यावसायिकाने सांगितले, 2001 मध्ये यूपीमध्ये लिकर किंग पाँटी चड्ढाचा बिझनेस नव्हता, तेव्हा त्याच्या कंपनीसाठी केडिया सेल्समनचे काम करायचा.
- त्याला कमिशन म्हणून 10 हजार रुपये महिना मिळायचा. तो स्कूटरवरून दारूच्या गुत्त्यांवर जाऊन ऑर्डर मिळवायचा.
- संजय केडियाची परिस्थिती एवढी बिकट होती की, 2005 पर्यंत त्याचे घर आणि जी थोडीफार शेतजमीन होती ते सर्व बँकेत गहाण होते.
- 2007 पर्यंत त्याच्यावर खूप कर्ज झालेले होते. त्याने कुणाकडून 5 हजार, कुणाकडून 10, तर काहींकडून 3-3 हजारही घेतलेले होते.
- परंतु 2008 पासून त्याचे नशीब फळफळले. त्या काळी मायावती सरकारमध्ये पाँटी चड्ढाला यूपीमध्ये दारूचा होलसेलचा ठेका आणि खाणपट्टा मिळाला होता.
- खूप दिवसांपासून तो चड्ढाच्या कंपनीशी जोडलेला होता, म्हणून त्याला गोरखपूरचा हेड बनवण्यात आले. येथूनच त्याची लॉटरी लागली.
- संजयला गाड्या आणि महागड्या शस्त्रांचा शौक आहे. त्याने आपल्याशिवाय कुटुंबीय आणि नातेवाइकांच्या नावे इम्पोर्टेड शस्त्रास्त्रे घेऊन ठेवलेली आहेत. वाहनांमध्ये अँडेव्हर, फोर्च्यूनर, स्कॉर्पियो, होंडा सिटी आणि इतर महागड्या गाड्या आहेत.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या प्रकरणाचे आणखी फोटोज विथ फॅक्ट्स...

बातम्या आणखी आहेत...