आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीला मारहाण करून मारून टाकले, नातेवाईकांना सांगितले- हार्ट अटॅक आला होता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यमुनानगर (हरियाणा)-  छछरौली येथील रामदासिया कॉलनीमधअये असगर नावाच्या व्यक्तीने मारहाण करून पत्नी मुमताज हेगम (45)ची हत्या केली. त्यानंतर तिच्या माहेरच्यांना सांगितले की, हार्ट अटॅकमुळे तिचा मृत्यू झाला. अंत्यसांस्कारासाठी नातेवाईक आले, तेव्हा त्यांना मुमदाजच्या मृतदेहावर अनेक मारहाणीचे व्रण दिसून आले. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळाताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले, परंतु, पोलिस पोहचण्यापूर्णच संधी साधून असगर तेथून फरार झाला. मुमताजच्या माहेरच्यांनी त्याचा पाठलाग केला आणि खारवन गावातून त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.


पोलिसांनी मृतदेहाची तपासनी केली, तेव्हा अत्यंत नुष्ठुरतेने तिची हत्या करण्यात आल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. तिच्या दोन्ही बाजू अनेक ठिकाणी तुटलेल्या होत्या. तसेच, तिच्या पायांवर देखील माहराणीचे व्रण दिसून आले. डोक्यावर जखम झाली आहे. जखमा पाहून असे वाटते की, रॉडने मारहाण करून तिची हत्या करण्यात आली असावी. मृतदेह जगाधरीच्या सरकारी रुग्नालयातील शवगृहात ठेवण्यात आला आहे. रविवारी मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्यात येणार आहे.


20 वर्षांपूर्वी झाले होते लग्न...
- मामली गावातील रहिवाशी आणि मृत मुमताजचा भाऊ जहांगीर याने सांगितले की, बहिनीचे लग्न 1992 मध्ये जैदरी येथील असगरशी झाले होते. असगर गाव सोडून कुटुंबासह छछरौली येथे राहण्यासाठी गेला होता. लग्नानंतर त्याला तिन मुलं झाले. दोन मुलं आणि एक मुलगी.
- त्यांनी सांगितले की, असगर नेहमी बहिणीला त्रास देत होता, सतत तिला मारहाण करत होता.
-अनेक वेळा कुटुंबातील लोकांनी त्याला समजावले, परंतु त्याने काहीही ऐकले नाही. यामुळे त्यांनी त्याला समजावने देखील  बंद केले आणि त्याचा घरी देखील जाणे बंद केले.


केस दाखल करून चौकशी सुरू...
पोलिस अधिकारी वीरेंद्र  राणा यांनी सांगितले की, पोलिसांनी आरोपी असगरविरोधात केस दाखल केली आहे. प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.


पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...