आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलगा नाही म्हणून पती बनला हैवान, पत्नी अन् चिमुरडला दिला एवढा भयानक मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मृत ममता आणि तिची मुलगी अवनी. - Divya Marathi
मृत ममता आणि तिची मुलगी अवनी.

मेरठ - यूपीच्या मेरठमध्ये मंगळवारी सकाळी डबल मर्डरमुळे मोठी खळबळ उडाली. येथे बहसुमा परिसरात एका आई व लहान मुलीची धारदार हत्याराने निर्घृणपणे हत्या करण्यात आली. परिसरात दहशत पसरली आहे. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. याप्रकरणी पती अनुज आणि सासूला अटक करण्यात आली आहे.  

 

काय आहे पूर्ण प्रकरण?

 

मुलगा न झाल्याने व्हायचा छळ
- सूत्रांनुसार, आरोपी अनुज कांवडवाला येथील रहिवासी आहे.
- 8 वर्षांपूर्वी मुझफ्फरनगरच्या जलालपूर गावच्या ममताशी त्याचे लग्न झाले होते.
- लग्नाच्या दोन वर्षांनंतर त्यांना मुलगी झाली, तिचे नाव त्यांनी अवनी ठेवले.
- आरोप आहे की, मुलगा न झाल्याने अनुज आणि सासू ममताला येता-जाता टोमणे मारायचे.
- गत सोमवारी यामुळे सासू-सुनेत जोरदार भांडण झाले. 
- आरोप आहे की यादरम्यान अनुजने संतापून धारदार हत्याराने ममताच्या गळ्यावर वार केला.
- ममताचा आरडाओरडा ऐकून निरागस अवनीही तेथे आली. तिने किंकाळी फोडली. यामुळे बापाने तिचाही गळा चिरला.

 

मर्डर करून आरामात झोपले पती अन् सासू
- हत्येनंतर अनुज आणि त्याची आई आरामात झोपी गेले.
- मंगळवारी सकाळी अनुजने ममताच्या कुटुंबीयांना फोन करून माहिती दिली की, तुमच्या मुलीने विष प्राशन केले आहे.
- आणि आम्ही तिच्या अंत्यसंस्काराची तयारी करत आहोत.
- संशय आल्याने ममताच्या भावाने पोलिसांना याची माहिती दिली.
- यानंतर दोन्ही आरोपींची पोलिस चौकशी करत आहेत.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या धक्कादायक घटनेचे आणखी फोटोज...

बातम्या आणखी आहेत...