आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतिने पत्नीला छतावरून फेकले, मुलांनी सांगितला बापाचा कारनामा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ- पन्ना जिल्ह्यात दारूच्या नशेत असलेल्या एका पतीने आपल्या पत्नीला छतावरून खाली फेकल्याची घटना घडली आहे. पती दारू पिऊन रोच पत्नीला मारहान करत होता. शुक्रवारी देखील पति दारू पिऊन आला आणि पत्नीशी वाद घालू लागला. पत्नीने जेव्हा याचा विरोध केला, तेव्हा रागाच्या भरात पतिने पत्नीला छतावरून खाली फेकले. घटनेनंतर पति फरार झाला आहे. पोलिसा त्याचा शोध घेत आहेत.


पन्ना पोलिसांनुसार, घटना रनवाहा गावातील आहे. येथे राहणारा विजय राजपूत नेहमी दारूच्या नशेत असतो. तो रोज दारू पिऊन पत्नीला मारहाण करतो. शुक्रवारी देखिल तो दारू पिऊन घरी आला आणि पत्नी हनुमतशी वाद घालू लागला. पत्नीने त्याला शांत राहण्यास सांगितले, तेव्हा त्याने रागाच्या भरात पत्नीला मारहाण करण्यास सुरूवात केली.


वाद एवढा वाढला की, संतापलेल्या पतिने पत्नी हनुमतला छतावरून खाली फेकून दिले. महिलेला छतावरून पडलेली पाहाताच आसपासचे लोक जमा झाले आणि त्यांनी तिला उपचासाराठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. महिलेच्या शरिरावर मारहाणीशिवाय खाली पडल्यामुळे झालेल्या जखमांचे निशान आहेत.

 

माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला. पोलिस येण्याची माहिती मिळताच आरोपी घटनास्थळाहून फारार झाला. पोलिसांनुसार, महिलेने यापूर्वी देखील पतिच्या विरोधात मारहाण आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दाखल केली होती. हनुमतने केलेल्या तक्रारीत म्हटले होते की, आरोपी कोणत्याही पातळीला जाऊ शकतो. एखादी दर्घटना देखील घडू शकते. पोलिसांनी तक्रार नोंदवून आरोपीचा शोध घेण्यास सुरूवात केली आहे.


पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्....

बातम्या आणखी आहेत...