आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीच्या मृतदेहासोबत 3 दिवस झोपला पती; दिवसा कुलूप लावून जायचा कामावर, असा झाला खुलासा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
> पत्नीची हत्या करून तिच्या मृतदेहासोबत पती दिवस झोपला. दुर्गंधी सुटल्याने खुलासा.
> आरोपीची तिसरी पत्नी आहे मृत महिला, आधीच्या 2 पत्नी सोडून गेल्या.
> रात्रभर त्याच खोलीत झोपायचा आरोपी, सकाळी कुलूप लावून कामावर जायचा.

 

कोरिया - चरचा परिसरातील एका घरात एका विवाहितेचा सडलेला मृतदेह आढळला. हत्या होऊन 3 दिवस उलटल्याचे सांगण्यात येत आहे. स्थानिकांना जेव्हा असह्य दुर्गंधी येऊ लागली तेव्हा त्यांनी सोमवारी पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी पतीला घरी बोलावून त्याला कुलूप उघडायला लावले आणि मृतदेह बाहेर काढला. पोलिस पतीची चौकशी करत आहेत.

- जिल्हा मुख्यालयाला लागून शिवपूर चरचा नगरपालिकेच्या विवेकानंद कॉलनीत एसईसीएल कर्मचारी अजित कुजूर आपल्या पत्नीसोबत राहत होता. स्थानिक सांगतात की, यापूर्वीही त्याची दोन लग्ने झालेली आहेत. दोन्ही पत्नी त्याला सोडून निघून गेल्या होत्या.

- यानंतर अजितने प्रभाशी लग्न केले होते. सोमवारी जेव्हा त्याच्या घरातून प्रचंड दुर्गंधी येऊ लागली तेव्हा स्थानिकांनी पोलिसांना सूचना दिली. पोलिस पोहोचल्यावर घराबाहेर टाळे लागले होते. लोक म्हणाले की, रात्री अजित येतो आणि सकाळी कुलूप लावून निघून जातो. अजितला बोलावून कुलूप उघडायला लावण्यात आले. घरात पलंगाखाली त्याच्या पत्नीची डेडबॉडी पडून होती.

- घटनास्थळी पोहोचलेल्या फॉरेन्सिक टीमने सांगितले की, महिला मृत होऊन 3 दिवस उलटले असावेत. आरोपी पती मागच्या 3 दिवसांपासून पलंगावर झोपत होता. खाली त्याच्या पत्नीचा मृतदेह पडलेला होता.
- मृतदेहाजवळ एक दोरी आढळली आहे. या दोरीच्या साहाय्यानेच पतीने तिची गळा आवळून हत्या केल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. आरोपी पतीला ताब्यात घेऊन पोलिस चौकशी करत आहेत.

फोटो : दिनेश द्विवेदी  

बातम्या आणखी आहेत...