आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजयपूर - राजस्थानमधील एक वरिष्ठ आरएएस अधिकारी नरेंद्र सिंह कुल्हरी (58) हे सोमवारी जयपूरमधील हॉटेल अंबरमध्ये निपचीत पडलेले सापडले होते. त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आल्यानंतर मृत घोषित करण्यात आले होते. अचानक झालेल्या मृत्यूचे कारण हार्ट अटॅक असल्याचे सांगितले गेले होते. नरेंद्र सिंह यांची एकुलती एक मुलगी कृतिका कुल्हरी आयएएस अधिकारी आहे. त्या सध्या हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यात एडीसी (विकास) आहेत.
अवघ्या 25 व्या वर्षी झाली आयएएस
- राजस्थानमधील झुंझुनूं जिल्ह्यातील रहिवासी कृतिकाने अवघ्या 25 व्या वर्षी लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) परीक्षा उत्तीर्ण केली होती.
- 2013 मध्ये झालेल्या यूपीएससी परीक्षेत कृतिका कुल्हरी यांना 162 वी रँक मिळवली होती. दुसऱ्या प्रयत्नात त्यांना हे यश मिळाले होते.
- 13 ऑगस्ट 1988 ला जन्मलेल्या कृतिका यांनी बिट्स पिलानी येथून बी.टेक केले होते. त्यानंतर वडिलांपपासून प्रेरणा घेऊन त्यांच्याप्रमाणे सिव्हिल सर्व्हिसमध्ये जाण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता.
- कृतिका यांचे वडील आरएएस नरेंद्र कुल्हरी हे बिकानेरमध्ये विभागीय उपसंचालक होते. ते झुंझुनूं जिल्ह्यातील सांगणी गावचे रहिवासी होते.
- कृतिका ही त्यांच्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. त्यांच्या भावाचे 2009 मध्ये निधन झाले होते.
- आयएएस होण्याच्या आपल्या प्रवासाबद्दल कृतिका यांनी सांगितले होते की स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी जॉबच्या अनेक चांगल्या ऑफर सोडल्या होत्या. एखादे स्वप्न पाहिले तर ते पूर्ण करण्यासाठी प्रामामिक प्रयत्नाने पूर्ण करण्यासाठी झटले पाहिजे.
शासकीय कामानिमित्त जयपूरला आले होते...
- वरिष्ठ आरएएस अधिकारी नरेंद्र सिंह कुल्हरी हे सोमवारी पोलोव्हिक्ट्री सिनेमा जवळील हॉटेल अंबरमध्ये निपचीत पडलेले दिसले होते.
- याची माहिती मिळतात पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. पोलिस पथक कुल्हरी यांना घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचले तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
- पोस्टमॉर्टमनंतर पोलिसांनी मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिला.
- पोलिस अधिकारी राकेश ख्यालिया यांनी सांगितले की नरेंद्र सिंह हे शासकीय कामानिमित्त जयपूरमध्ये आले होते. रविवारी सायंकाळी ते येथे आले आणि हॉटेल अंबरमध्ये मुक्कामी होते. त्यांच्यासोबत बिकानेर येऊन नगरपालिकेचे अधिकारी बृजेस कुमारही सोबत आले होते. ते शेजारच्या रुममध्ये थांबलेले होते. सोमवारी त्यांना दिल्लीला जायचे होते. यासाठी 9 ते 10 वाजता दरम्यान बृजेश यांनी नरेंद्र सिंह यांना फोन केला. फोन रिसिव्ह न झाल्यामुळे त्यांनी पोलिसांना कॉल केला.
- घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी हॉटेलच्या रुमचे दार तोडून आत प्रवेश केला. तिथे नरेंद्र सिंह बेडवर निपचीत पडलेले होते. पोलिस त्यांना घेऊन हॉस्पिटलमध्ये गेले तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, कृतिका आणि त्यांच्या वडिलांचे फोटो...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.