आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला आयएएसने अधिकाऱ्यावर केला लैंगिक शोषणाचा आरोप, सांगितले जीवाला धोका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पीडित आयएएस अधिकारी. - Divya Marathi
पीडित आयएएस अधिकारी.

रोहतक/पानीपत/फतेहाबाद - पशुपालन आणि डेअरी विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव (एसीएस) सुनील कुमार गुलाटी यांच्यावर त्यांच्याच विभागाच्या एका महिला आयएएस अधिकाऱ्याने लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. त्यांनी करिअर खराब करण्याचा आणि ऑफिसमध्ये उशिरापर्यंत बसवून ठेवण्याचा आरोप केला आहे. त्यासोबतच आपल्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे. या संबंधामध्ये त्यांनी राष्ट्रपती आणि केंद्र सरकारला इ-मेलद्वारे तक्रार केली आहे. तक्रारदार आयएएस महिला अधिकाऱ्याने डीजीपींकडेही सुरक्षेची मागणी केली आहे. याआधी त्या सिरसा येथील डबवाली येथे एसडीएम होत्या. 1984च्या बॅचचे आयएएस अधिकारी सुनील कुमार गुलाटी यांनी सर्व आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे, महिला आयोगाच्या अध्यक्ष प्रतिभा सुमन यांनी या प्रकरणाची चौकशी होणार असल्याचे म्हटले आहे. 

 

एएसीएस गुलाटी यांनी रविवारी पशुपालन विभागाच्या रोहतक विभागाच्या व्हेटर्नरी सर्जन व अधिकाऱ्यांची बैठक झाली. गुलाटी यांच्यावर आरोप करणाऱ्या महिला अधिकारी या बैठकीला उपस्थित नव्हत्या. 

बातम्या आणखी आहेत...