आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • तोंड लपवून या IAS महिलेने केले सरेंडर, कबूल केला आपला गुन्हा Ias Officer Nirmala Meena Surrender At Acb Office

तोंड लपवून या IAS महिलेने केले सरेंडर, कबूल केला गुन्हा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोधपूर - 6 वेळा जोधपूरच्या डीएसओ राहिलेल्या सीनियर IAS निर्मला मीणा यांना 8 कोटींच्या गहू घोटाळ्याच्या खटल्यात एसीबीसमोर 16 मे रोजी आत्मसमर्पण करावेच लागले. मीणा यांनी स्वत:ला वाचवण्यासाठी सर्व प्रयत्न केले, परंतु काहीच उपयोगी पडले नाहीत. त्या सुप्रीम कोर्टापर्यंत गेल्या, परंतु मार्चमध्ये जेव्हा एसीबीच्या धाडी पडल्या आणि एसीबीला त्यांच्या घरातून 10 कोटी रुपयांच्या 19 प्रॉपर्टीची कागदपत्रे मिळाली तेव्हा त्यांना आपल्या परिस्थितीची कल्पना आली. त्या वेळी मीणा मानसिकदृष्ट्या खचून गेल्या आणि त्यांनी आत्महत्येचाही विचार केला. त्यांनी एक सुसाइड नोटही लिहिली होती. हे पत्र त्यांच्या पतीने पाहिले आणि त्यांच्यावर उपचारांसाठी त्यांनी अजमेरला नेले. मग दोन्ही मुले जी बाहेरगावी शिकत होती, त्यांनाही बोलावून घेतले.

- कुटुंबीयांनी धीर दिल्यानंतर त्यांनी हायकोर्टाच्या निर्णयाची प्रतीक्षा केली, निकाल विरोधात गेल्यावर पतीसोबत सुप्रीम कोर्टाचे दार ठोठावले.
- तेथेही खालच्या कोर्टाप्रमाणेच झाले आणि सरेंडर होण्यासाठी त्या मजबूर झाल्या. आता त्या आपल्या पतीला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.

- सरेंडर करण्यासाठी त्या वकिलासोबत आल्या होत्या, पती सोबत नव्हता. एसीबीच्या दुसऱ्या एका केसमध्ये पतीही आरोपी आहे. पतीबाबत विचारल्यावर मीणा म्हणाल्या- कुठे आहेत, हे मला माहिती नाही.

- त्यांनी रडतच गव्हाचा काळाबाजार केल्याचे कबूल केले आणि पतीला सोडून देण्याची विनवणी करत राहिल्या.
- एसीबीचे एस.पी. अजयपाल लांबा म्हणाले की, सरेंडर केल्यानंतर संध्याकाळ होण्याआधी मीणा यांना पावटा सॅटेलाइट रुग्णालयात नेऊन वैद्यकीय चाचणी करण्यात आली, मग उदयमंदिर पोलिस स्टेशनला पाठवले.

 

तोंड लपवून आल्या, घोटाळ्याचा पर्दाफाश झाला..
- निर्मला मीणा यांनी दुपारी सरेंडर केले. तेव्हा त्यांचे तोंड पूर्णपणे झाकलेले होते. डीएसपी जगदीश सोनी आणि तपास अधिकारी मुकेश सोनी यांनी चौकशी सुरू करण्याआधी झाकलेला चेहरा दाखवायला सांगितला तेव्हा त्यांनी नकार दिला.
- त्यांनी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर दिले नाही. नंतर एस.पी. अजयपाल लांबा चौकशी करायला पोहोचले तेव्हाही काही बोलल्या नाहीत. पोलिसांनी सक्ती केल्यावर त्यांनी लगेच दुपट्टा हटवला आणि गुन्हाही कबूल केला.
- एसपी लांबा म्हणाले की, पोलिस कोठडी घेतल्यावर घोटाळ्याचा पूर्ण पर्दाफाश केला जाईल. यात सहभागी इतरांनाही अटक करण्यात येईल.

 

अडीच तासांत उतरली IAS असल्याची गुर्मी
- डीएसपी यांच्यासमोर खुर्चीवर बसलेल्या मीणा यांना पाणी देण्यात आले, मीणा यांनी नकार दिला. डीएसपी म्हणाले की, याला आपले घरच समजा, तर म्हणाल्या हे माझे घर कसे काय होईल? यावर डीएसपी म्हणाले- आता काही दिवस हेच तुमचे घर असेल.
- हे ऐकून मीणा गप्प झाल्या. थोड्या वेळाने पाण्याचा ग्लास घेतला आणि दुपट्टा हटवून पाणी प्यायल्या. मग प्रश्नांच्या फैरी सुरू झाल्या, परंतु त्यांनी तोंड उघडले नाही.
- एसआय सुमन यांना आत बोलावून एसपी म्हणाले की, सत्य काय ते सांगा, नाहीतर आम्ही आमच्या पद्धतीने चौकशी करू. हे ऐकताच त्यांची गुर्मी उतरली आणि त्यांनी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर द्यायला सुरुवात केली.


तुरुंगाच्या पाहुण्या बनल्या पहिल्या महिला IAS
जोधपूर सेंट्रल जेलमध्ये भंवरी अपहरण व हत्या प्रकरणातील आरोपी माजी मंत्री मदेरणा, पूर्व आमदार मलखानसिंह बिश्नोई बंद राहिले आहेत. मलखानसिंह अजमेरला शिफ्ट झाले, मदेरणा व इंद्रा बिश्नोई येथेच आहेत. याच तुरुंगात सलमान खानने काही दिवस घालवले आणि आसाराम मागच्या साडेचार वर्षांपासून बंद आहे. भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये आरएएस, आरएमएस व अनेक इंजीनिअर तसेच जेडीएचे माजी चेयरमन राजेंद्र सोलंकी, जेएनव्हीयू शिक्षक भरती केसमधील माजी कुलपति बीएस राजपुरोहित व माजी आमदार जुगल काबरा यांना तुरुंगवास झालेला आहे, परंतु निर्मला मीणा पहिल्या अशा महिला आयएएस ठरल्या, ज्या या तुरुंगाच्या पाहुण्या बनतील. 

 

पुढील स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी फोटोज... 

बातम्या आणखी आहेत...