आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नक्षल्यांनी भूसुरुंगाने वाहन उडवले, 7 जवान शहीद; शस्त्रेही लुटून नेली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगलपूर - छत्तीसगडमध्ये नक्षलग्रस्त भागात सुरू असलेल्या रस्तेमार्गाच्या कामावरील मजुरांच्या सुरक्षेसाठी रवाना झालेल्या पोलिसांचे वाहन चोलनार जंगलात नक्षल्यांनी भूसुरुंगाने उडवून दिले.  यात सात जवान शहीद झाले. एक गंभीर जखमी झाला. स्फोट इतका भयंकर होता की पोलिसांच्या वाहनाचे अक्षरश: तुकडे झाले. स्फोटानंतर हे वाहन २० फूट उंच उडाले. घटनास्थळी ८ फूट खोल खड्डा पडला. वाहनात  ७ जवान होते. नक्षल्यांनी हल्ल्यानंतर पोलिसांची शस्त्रेही पळवून नेली.


जीपमध्ये होते 7 जवान
न्यूज एजन्सीच्या वृत्तानुसार दंतेवाडाचे अॅडिशनल एसपी जीएन बघेल यांनी हल्ल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले की, सर्चिंगसाठी निघालेल्या पोलिसांच्या गाडीत 7 पोलिस जवान स्वार होते. नक्षल्यांनी ब्लास्ट केल्यानंतर जवानांवर फायरिंगही केले. एवढेच नाही तर जवानांच्या दोन एके 47, दोन एसएलआर, दोन इन्सास रायफल आणि दोन ग्रेनेडही पळवले. पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले अशून नक्षल्यांना पकडण्यासाठी अभियान राबवले जात आहे.


मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वी हल्ला.. 
22 मे रोजी विकास यात्रा अंतर्गत मुख्यमंत्री रमन सिंह कोंटा विधानसभा मतदारसंघातील दोरनापालमध्ये सभा घेतील. त्या पार्श्नभूमीवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.  या सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी जाणाऱ्या पोलिसांना नक्षल्यांनी सापळा रचून स्फोटाद्वारे उडवले. हा हल्ला विकासविरोधी असून याला जशास तसे उत्तर दिले जाईल, असे रमन सिंह म्हणाले आहेत. 

 

(सर्व फोटो - रमाशंकर साहू)

 

बातम्या आणखी आहेत...