आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • फुकट भाजी दिली नाही म्हणून पोलिसांनी डांबले तुरुंगात If Police Trap You In False Case You Can Defense Using These 4 Rights

फुकट भाजी दिली नाही म्हणून पोलिसांनी डांबले तुरुंगात, खोट्या केसमध्ये पोलिसांनी अडकवल्यास असा करा बचाव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूज डेस्क - पाटण्यामध्ये एका भाजी विक्रेत्या व्यक्तीला पोलिसांनी खोट्या केसमध्ये अडकवण्याचे प्रकरण समोर आले आहे. रिपोर्ट्सनुसार, ही व्यक्ती पोलिसांना फुकट भाजीपाला देत नव्हता, म्हणून चिडून पोलिसांनी बापलेकाला उचून ठाण्यात आणले. मग बाइक चोरीच्या आरोपात मुलाला तुरुंगात डांबले. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी चौकशीनंतर 12 पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. रिटायर्ड सीएसपी गिरीश सुबेदार आणि म. प्र. हायकोर्टाचे अॅडव्होकेट संजय मेहरा म्हणाले की, पोलिसांनी तुम्हाला मुद्दाम एखाद्या प्रकरणात अडकवले तर तुम्ही अशा पद्धतीने स्वत:चा बचाव करू शकतात.

 

बचावाची पहिली पद्धत
जर तुम्हाला वाटले की, पोलिस स्टेशन लेव्हलवर म्हणजेच शिपाई, एसआय, टीआय यासारखे अधिकारी तुम्हाला त्रास देत आहेत तर सर्वात आधी वरिष्ठ अधिकाऱ्याकडे प्रकरण न्या. तुम्ही तुमच्या परिसरातील सीएसपी, एसपी किंवा डिआयजींना भेटून पूर्ण घटना सांगू शकतात. जे काही पुरावे असतील, तेही सोबत न्या.

 

बचावाची दुसरी पद्धत
पोलिस हेडक्वार्टरमध्ये तक्रार विभाग असतो. तेथे जाऊन तुम्ही तक्रार नोंदवू शकतात. जे पुरावे असतील, तेही देऊ शकतात. याशिवाय कलेक्टोरेटमध्ये जनसुनावणी होते. तेथेही तुम्ही याची तक्रार करू शकतात.

 

बचावाची तिसरी पद्धत
आता प्रत्येक राज्यात मुख्यमंत्र्यांना ऑनलाइन तक्रार केली जाऊ शकते. तुम्हीही ही सुविधा वापरू शकता. यामध्ये ठरावित वेळेत अॅक्शन घेणे गरजेचे असते. जर अधिकारी ऐकत नसतील, तर हीसुद्धा बचावाची एक पद्धत आहे.

 

बचावाची चौथी पद्धत
या सर्व जागांवर काहीच झाले नाही, तर तुम्ही एखाद्या वकिलाच्या मदतीने हायकोर्टात याचिका दाखल करू शकता. कोर्टात तुम्हाला पुरावे व साक्षीदार सादर करावे लागतील, जे तुमचे म्हणणे सिद्ध करू शकतील. कोर्ट पोलिस अधिकारी दोषी आढळल्यास कारवाईचा आदेश देतेच, शिवाय तुम्हाला भरपाईचा देण्याचाही आदेश देऊ शकते.     

बातम्या आणखी आहेत...