आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रजनीकांत यांचा ध्वज भगवा असल्यास आघाडी नाही! कमल हासन यांनी केले स्पष्ट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

केम्ब्रिज- अभिनेता रजनीकांत यांच्या राजकीय पक्षाचा ध्वज भगव्या रंगाचा असल्यास त्यांच्यासोबत आघाडी करण्यात स्वारस्य राहणार नाही, असे अभिनयाकडून राजकारणात उतरलेले कमल हासन यांनी स्पष्ट केले आहे. केशरी रंगाशी भाजपचा संबंध येतो. त्यामुळे हासन यांनी भूमिका घेतल्याचे सांगितले जाते.  


रजनीकांत यांच्याशी युती करण्याचा विचार आहे का ? या प्रश्नावर रविवारी ते बोलत होते. समविचार किंवा कल्पना असलेल्या लोकांशी युती केली जाते. धर्म, पंथाशी संबंधित आणि भगव्यांशी आघाडीचा प्रश्न निर्माण होत नाही. रजनी यांच्या पक्षाचा देखील भगवा रंग नसेल, अशी माझी अपेक्षा आहे. मात्र त्यांचा ध्वज त्या रंगाचा असल्यास रजनी यांच्या पक्षासोबत आघाडी करण्यात आम्हाला काहीही स्वारस्य नसेल. रविवारी हार्वर्ड विद्यापीठातील भारतीय परिषदेत हासन बोलत होते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी कमल हासन यांनी केजरीवाल यांनी चेन्नईत कमल हासन यांची भेट घेतली होती. त्यात केजरीवाल यांनी त्यांना आघाडीचा प्रस्ताव दिला होता.  


...तर इतर पक्षांशी आघाडी शक्य  
आघाडीबाबत एवढ्यात काहीही सांगता येणार नाही. मात्र माझ्या पक्षाची दारे खुली आहेत. भविष्यात गरज भासल्यास आम्ही इतर पक्षांसोबतदेखील आघाडी करू शकतो. परंतु भगव्या रंगाचा ध्वज असल्यास निवडणुकीनंतरदेखील आघाडी शक्य नाही. मात्र बहुमत नसल्यावरची समीकरणे वेगळी असू शकतात. लोकांचा कौल असतो. परंतु मी सोबत जाणार नाही. बहुधा पुढची प्रतीक्षा करेन, असे कमल हासन यांनी स्पष्ट केले.  


लोकांसोबत चालायचे आहे...  
राजकारणात प्रवेश करण्यामागील उद्देश स्पष्ट आहे. मला लोकांसोबत चालायचे आहे. राजकारण्यांबरोबर नाही. त्याचबरोबर तामिळनाडूमध्ये सर्वकाही ठीक चालले आहे, असे समजण्याचे मुळीच कारण नाही. मला वाटते, राज्यात नवी क्रांती उदयाला येऊ लागली आहे. मला जिहाद कळत नाही. परंतु तिरस्कारावर प्रेमाचा विजय निश्चित आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  

बातम्या आणखी आहेत...