आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Illicit Relationship: Married Woman Cut The Private Part Of Brother In Law In Bihar

दीर-भावजयीचे अवैध संबंध: दिराच्या लग्नामुळे चिडलेल्या भावजयीने कापला प्रायव्हेट पार्ट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सीतामढी (बिहार) - विवाहिते प्रेयसीशी संबंध ठेवणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले. शेजारीच राहणाऱ्या नात्यातील भावजयीशी तरुणाचे अनेक वर्षांपासून अवैध संबंध होते. त्याच्या लग्नानंतर मात्र तो पत्नीसोबतच जास्त वेळ घालवू लागला. हीच गोष्ट भावजयीला खटकली. चिडून तिने त्याचा प्रायव्हेट पार्ट कापल्याची घटना सीतामढीमध्ये घडली आहे. तू माझा नाही झालास, तर कुणाचाच होऊ देणार नाही म्हणत विवाहितेने त्याचा प्रायव्हेट पार्ट धारदार शस्त्राने कापून टाकला. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे. 

 

असे आहे प्रकरण...
पोलिसांनी सांगितले, सीतामढ़ी जिल्ह्यातील डुमरा परिसरातील केथरिया गावातील रहिवासी रमेश पासवान (21) चे आपल्या शेजारी राहणाऱ्या नात्यातील भावजयी रंजू (35) शी अनेक वर्षांपासून अवैध संबंध होते. यादरम्यान रमेशचे दुसरीकडे लग्न ठरले आणि झालेही. लग्नानंतर रमेश त्याच्या पत्नीसोबतच जास्त वेळ घालवत होता. प्रेयसीला जास्त वेळ देऊ शकत नव्हता.

 

भावजयीने रागाच्या भरात केले हे कृत्य...
रमेश भावजयीला सोडून पत्नीशी संबंध ठेवतो म्हणून चिडून आरोपी महिलेने त्याचे गुप्तांग धारदार शस्त्राने कापून टाकले. आरोपी विवाहिता रमेशला त्याच्या पत्नीला सोडून तिच्यासोबत राहण्यासाठी दबाव टाकत होती. याला रमेशने नकार दिला होता. सोमवारी संध्याकाळी रंजूने रमेशला बहाण्याने आपल्या घरी बोलवून त्याच्याशी गप्पा मारू लागली. रमेश जवळ येताच तिने धारदार शस्त्राने रमेशचे गुप्तांग कापून टाकले. 

 

पोलिसांनीच नेले रुग्णालयात...
रमेशच गुप्तांग कापल्याची बातमी अख्ख्या गावात वाऱ्यासारखी पसरली. गावकऱ्यांनी लगोलग पोलिसांना माहिती कळवली. पोलिस येईपर्यंत रमेश वेदनांनी विव्हळत पडून होता.

डुमरावचे पोलिस स्टेशन इंचार्ज विकास कुमार यांनी मंगळवारी सांगितले की, गावकऱ्यांनी माहिती दिल्यावर पोलिस तेथे पोहोचले. पोलिसांनीच जखमी रमेशला सीतामढी रुग्णालयात दाखल केले. तेथून अधिक चांगल्या उपचारांसाठी त्याला मुजफ्फरपूरच्या श्रीकृष्ण मेमोरियल कॉलेज हॉस्पिटल (एसकेएमसीएच) मध्ये पाठवण्यात आले आहे. आरोपी महिला रंजूला अटक करण्यात आली आहे.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, अवैध संबंध कळल्यावर पंचायतीने सोडले होते फर्मान... 

 

 

बातम्या आणखी आहेत...