आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्रिपुरात 25 वर्षांत भाजपचे खातेही उघडलेे नाही; 99% अनामत जप्त, यंदा 51 उमेदवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अागरतळा- भाजपने त्रिपुरात डाव्या पक्षांच्या लाल किल्ल्यावर ताबा मिळवण्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली अाहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी गुरुवारी राज्यात दाेन निवडणूक प्रचारसभा घेतल्या. यासह भाजपकडून राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, सुमारे दाेन डझन केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, वरिष्ठ नेते व १००हून अधिक खासदार, अामदार राज्यात सातत्याने जनसंपर्क ठेवून प्रचारसभा घेत अाहेत. त्रिपुरात बंगाली हिंदू लाेकसंख्येत सुमारे ७० % नाथ याेग संप्रदायाचे मतदार अाहेत. अागरतळात नाथ मंदिरदेखील अाहे. या संप्रदायाला अापल्याकडे अाकर्षित करण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री याेगी अादित्यनाथ यांनी दाेन दिवस राेड शाे करून जाहीर सभा घेतल्या.

त्रिपुरात भाजप प्रादेशिक पक्ष इंडिजिनियस पीपल्स फ्रंट अाॅफ त्रिपुरा (अायपीएफटी)साेबत निवडणूक लढवत अाहे. भाजपने ६० पैकी ५१, तर अायपीएफटी पक्षाने ९ जागी अापले उमेदवार दिले अाहेत. स्वतंत्र अादिवासीबहुल त्रिपुरालॅण्डची मागणी अायपीएफटी सातत्याने करत अाहे. भाजपच्या निवडणूक प्रचाराची कमान अासामचे मंत्री तथा नाॅर्थ-ईस्ट डेमाेक्रॅटिक अलायन्स (नेडा)चे संयाेजक डाॅ.हिंमत विश्व शर्मा यांच्या हातात अाहे.  राज्यात गत २५ वर्षांपासून माकपची सत्ता अाहे; परंतु या वेळी माकपला अापला गड वाचवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागत अाहे. ते गेल्या २० वर्षांपासून राज्याचे मुख्यमंत्री अाहेत. त्यामुळे भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी अद्याप कुणाच्याही नावाची घाेषणा करण्यात अालेली नाही. मागील पाच विधानसभा निवडणुकांत माकपला अाव्हान देणाऱ्या कांॅग्रेस व तृणमूल कांॅग्रेस या पक्षांची काहीशी पीछेहाट झाली असून, भाजप दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनला अाहे. कारण तृणमूलच्या सहा अामदारांनी निवडणुकीपूर्वीच भाजपची वाट धरली हाेती. 

 

ईशान्येच्या तीन राज्यांतून निवडणुकांचा ग्राउंड रिपाेर्ट

पूर्वाेत्तरकडील त्रिपुरात १८ फेब्रुवारीला, तर मेघालय व नागालॅण्डमध्ये २७ फेब्रुवारीला मतदान हाेत अाहे. भाजप या तिन्ही राज्यांतील निवडणुकांत संपूर्ण शक्तीनिशी उतरला असून, तेथील सत्ताधाऱ्यांना अाव्हान देताना भाजपचे २५हून अधिक केंद्रीय मंत्री प्रचाराला लागले अाहेत. शिवाय पंतप्रधान माेदींनी गुरुवारी त्रिपुरात दाेन प्रचारसभा घेतल्या.

 

मेघालयातून... काँग्रेसला भाजपचे आव्हान  

निवडणूक प्रचारात कलाकार गीत-संगीत सादर करतात, नंतर नेत्याचे भाषण होते  

 

मेघालयामध्ये यंदा भाजप-काँग्रेस दरम्यान लढत आहे. आता निवडणूक प्रचारात हळूहळू संगीताचे सूर घुमत आहेत. मंचावर प्रथम स्थानिक कलाकार संगीत सादर करतात. नंतर नेत्यांचे भाषण होते. 

- मेघालय विधानसभा निवडणुकीत ३७२ उमेदवार मैदानात आहेत. पैकी ३४० पुरुष आणि ३२ महिला उमेदवार आहेत.  
- भाजप राज्यातील ४७ जागांवरून निवडणूक लढवत आहे. इतर १३ जागा प्रादेशिक पक्षांसाठी आहेत.  
- निवडणुकीच्या पूर्वी भाजपमध्ये ५ विद्यमान आमदार सामील झाले. २०१३ मध्ये  भाजपला २ जागा मिळाल्या .  
- काँग्रेसचे २९ आमदार आहेत. मेघालयाचे मुख्यमंत्री मुकुल संगमा सतत ४ वेळा विधानसभेत निवडून आले होते.  
- काँग्रेसने येथे माजी मुख्यमंत्री आेमान चांडी व भाजपने केंद्रीय मंत्री केजे अल्फोन्सोंकडे प्रचार मोहीम दिली.  

 

 

नागालँडहून... भाजपने युती तोडली  

माजी सीएम नेफ्यू रियो मतदानापूर्वीच निवडणूक जिंकले, पुन्हा सूत्रे ?  

नागालँडचे माजी मुख्यमंत्री व एनडीपीपी नेता नेफ्यू रियो मतदानापूर्वीच बिनविरोध विजयी झाले. भाजप-एनडीपीपी युती त्यांना मुख्यमंत्री घोषित करू शकते. रियो उत्तर अंगामी-२ तून रिंगणात आहेत.  

 

- रियो नुकतेच एनपीएफमधून एनडीपीपीमध्ये सामील झाले होते. ३ वेळा मुख्यमंत्रिपदी होेते.  
- नागालँडच्या ५९ जागांसाठी २७ रोजी मतदान आहे. १९५ उमेदवार येथून उभे आहेत. ५ महिला आहेत.  
- भाजपने निवडणुकीपूर्वीच एनपीएफशी १५ वर्षे जुनी युती तोडली. एनडीपीपीशी युती केली.  
- एनडीपीपी ४० व भाजप २० जागांसाठी रिंगणात आहेत. एनपीएफ ५९ जागांवरून निवडणूक लढवत आहे.  
- सीएम टीआर जेलियांग ७ - पेरेन जागेवरून लढत आहेत. मंत्री किरेन रिजिजू भाजप निवडणूक प्रभारी आहेत.

 

पुढील स्‍लाइडवर वाचा, सरकार सर्वात गरीब मुख्यमंत्री; ना कार, माेबाइल, ना घर आणि माहिती... 

बातम्या आणखी आहेत...