आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • In Gujarat, 58 Thousand Trees Of Maharashtra Are In The Process Of Keeping Water

गुजरातेत नर्मदेचे पाणी शुद्ध ठेवण्यासाठी महाराष्ट्राची 58 हजार झाडे ताेडली; झाडांमुळे पाणी अशुद्ध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजपिपला- पाणीटंचाईमुळे त्रस्त असलेल्या गुजरातेत आता तब्बल १.७० लाख झाडांची तोडणी सुरू झाली आहे. ही झाडे नर्मदा नदीवरील सरदार सरोवर धरणाच्या बुडीत क्षेत्रातील आहेत. धरणाचे पाणी शुद्ध ठेवण्यासाठी ही वृक्षतोड केली जात आहे. विशेष म्हणजे यात महाराष्ट्राच्या हद्दीतील तब्बल ५८ हजार झाडांचा समावेश आहे. ही झाडे धरणापासून १३८ ते १२२ मीटर जवळ आहेत. नर्मदा नदीवरील धरणावर ३० दरवाजे बसवल्यामुळे धरणाची उंची वाढून १३८.६८ मीटरवर गेली आहे. उंची वाढल्यामुळे धरणाच्या साठवण क्षमतेतही वाढ झाली आहे. 


जल संकटाच्या पार्श्वभूमीवर गुजरातला धरणाच्या साठवण क्षमतेतील पाण्याचा कमाल वापर करण्याची परवानगी मिळाली आहे. यामुळे धरणाचे पाणी शुद्ध ठेवणे क्रमप्राप्त आहे. 

 

अशी वृक्षतोड

> ९० हजार धरण कॅचमेंट क्षेत्रात
> ५८ हजार महाराष्ट्राच्या वनक्षेत्रात
> १३ हजार छोटा उदेपुरात
> १० हजार क्वांटच्या वनक्षेत्रात

 

अाधीही तोडली होती झाडे, ती पुन्हा उगवली 

नर्मदाचे डीएफओ डाॅ. के. शशिकुमार यांनी सांगितले की, नर्मदा धरणाची उंची वाढल्यामुळे त्याच्या बुडीत क्षेत्रातील वृक्षांची आधीही तोड करण्यात आली होती. मात्र ही झाडे पुन्हा उगवली. पुन्हा ती वाढू नये म्हणून आता त्यांची तोड करण्यात येत आहे. शशिकुमार म्हणाले, अनेक वर्षे झाडे पाण्यात बुडाल्याने सडतात. त्यामुळे धरणाचे पाणी अशुद्ध होेते. नर्मदेवरील सरदार सरोवर धरणाचे पाणी शुद्ध ठेवण्यासाठी ही वृक्षतोड केली जात आहे. 

 

- धरणाची उंची वाढवल्यानंतर १९८०, १९९२, २००४ मध्येही वृक्षतोड झाली होती.
- धरण विद्युतनिर्मिती प्रकल्पातील ५७ टक्के वीज महाराष्ट्राला मिळणार आहे. 
- तसेच महाराष्ट्रातील ३७,५०० हेक्टर भागाला सिंचनाची सुविधा.

बातम्या आणखी आहेत...