आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुंडाने दिवसाढवळ्या हिसकावली पोलिसाची सर्व्हीस रिव्हॉल्वर, रस्त्यातच लागला रडायला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - लखनऊमध्ये मंगळवारी दिवसाढवळ्या एका गुंडाने पोलिसाची सर्व्हीस रिव्हॉलव्हर पळवली. सर्व्हीस रिव्हॉल्व्हर चोरी केल्याने नोकरी जाणार या भितीने पोलिस इन्सपेक्टर अंजनी कुमार पांडे रस्त्यावरच रडायला लागले. प्रमोद कुमार एका तरुणाच्या बाईकवर लिफ्ट घेऊन पोलिस ठाण्यात जात होते. अवध हॉस्पिटलजवळ ट्राफिकमुळे गाडी थांबली. त्याचवेळी मागून आलेल्या एका गुंडाने त्यांच्या बेल्टमधून रिव्हॉल्व्हर काढली आणि तो पळून गेला. 


घटनेच्या दरम्यान गुप्ता यांनी आरडाओरडा केल्याने लोक त्या गुंडामागे पळाले. पण त्याच्याकडे बंदूक असल्याने सर्व मागे फिरले. हा आरोपी एका मोटारसायकलवरून पळून गेला. पण गडबडीत त्याचा मोबाईल खाली पडला. पोलिसाने तो मोबाईल ताब्यात घेतला. पोलिसांनी सीसीटिव्ही फुटेज आणि नाकेबंदी करून तरुणाचा शोध घेत त्याला अटक केली आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...