आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एअरफोर्सचे हॉक एअरक्राफ्ट ओडिशाच्या मयूरभंजमध्ये क्रॅश, पायलट झाला जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एअरफोर्सचे एक विमान ओडिशाच्या मयूरभंजमध्ये क्रॅश झाले आहे. या अपघातामध्ये अद्याप कोणतीही हानी झाल्याचे वृत्त नाही. - Divya Marathi
एअरफोर्सचे एक विमान ओडिशाच्या मयूरभंजमध्ये क्रॅश झाले आहे. या अपघातामध्ये अद्याप कोणतीही हानी झाल्याचे वृत्त नाही.

भुवनेश्वर​ - एअरफोर्सचे एक हॉक एअरक्राफ्ट मयूरभंजच्याजवळ  क्रॅश झाले आहे. हे विमान रुटीन उड्डाणासाठी गेलेले होते, असे सांगितले जात आहे. या अपघातामध्ये पायलट जखमी झाल्याचे समोर आले आहे. भारतीय हवाईदलाने दिलेल्या माहितीनुसार पायलटला विमानातून बाहेर काढण्यात यश आले आहे. त्याला झारखंडच्या हेडक्वार्टर हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. या अपघाताचे नेमके कारण काय हे मात्र अद्याप समोर आलेले नाही. 


केव्हा झाला अपघात 
- न्यूज एजन्सी एएनआयच्या नुसार अपघात दुपारी 1 वाजता झाला. एअरक्राफ्ट कलाईकुंडहून रुटीन उड्डाणासाठी निघाले होते. 
- या अपघातामध्ये जो पायलट जखमी झाला आहे, तो प्रशिक्षणार्थी होता. 
- एअरफोर्सने सांगितले की, या प्रकरणाची चौकशी कर्नल रँकच्या अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आली आहे.