आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय लष्कराने 47 दिवसांत मारले 20 PAK रेंजर्स, 200 दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय लष्कराने 2017 मध्ये 138 पाकिस्तानी सैनिकांना ठार केले. - Divya Marathi
भारतीय लष्कराने 2017 मध्ये 138 पाकिस्तानी सैनिकांना ठार केले.

पुंछ (जम्मू-काश्मीर) - भारतीय लष्काराने यावर्षी नियंत्रण रेषेवर (LoC) केलेल्या फायरिंगमध्ये पाकिस्तानच्या 20 रेंजर्सला ठार केले. 7 जण जखमी झाले. याशिवाय राज्यातील उत्तर आणि दक्षिण पीर पंजाल येथे 180 ते 200 दहशतवाद्यांनी LoC पार करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे येथे पेट्रोलिंग वाढवण्यात आली आहे. न्यूज एजन्सीने सरकारी सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. 

 

खोऱ्यात लष्कराच्या हलचालींमध्ये वाढ 
- रिपोर्टमध्ये म्हटले आहे, की खोऱ्यात पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. ते पाहाता येथे लष्कराच्या हलचाली वाढवण्यात आल्या आहेत. 

 

क्षेपणास्त्रांचाही वापर 
- सूत्रांची माहिती आहे की पाकिस्तानच्या अनेक पोस्ट उद्ध्वस्त करण्यात भारतीय जवानांना यश आले आहे. 778 किलोमीटर लांबीच्या LoC वर बालनोई, मेंढर, कालल, केरन, डोडा यासारख्या ठिकाणांवर 4-5 महिन्यांपासून कारवाई सुरु आहे. यामध्ये लाइट फिल्ड गन, हेवी 120mm मोर्टार आणि अँटी टँक गाइडेड मिसाइल्सचाही वापर होत आहे. 

 

पाककडून रेड अलर्ट जारी, भारतीय कमांडर्सचा दौरा वाढला 
- भारतीय लष्कराकडून होत असलेल्या सततच्या कारवाईमुळे पाकिस्तानने बॉर्डरला लागून असलेल्या पोस्टवर रेड अलर्ट जारी केला आहे. 
- दुसरीकडे बॉर्डरच्या भागात भारतीय कमांडर्सचे दौरे वाढले आहेत. ही कारवाई सर्जिकल स्ट्राईकनंतर सुरु झाली आहे. 

 

2017 मध्ये 138 PAK सैनिक मारले 
- भारतीय लष्कराने 2017 मध्ये 138 पाकिस्तानी सैनिकांना ठार केले. जम्मू-काश्मीरमध्ये एलओसीवर झालेल्या कारवाईत 155 पाकिस्तानी रेंजर्स जखमी झाले आहेत. या दरम्यान भारताचे 28 जवान शहीद झाले, तर 70 जखमी झाले आहेत. न्यूज एजन्सीने सरकारी सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. 

 

2017 मध्ये एकूण 210 दहशतवाद्यांना कंठस्नान 
- रिपोर्टमध्ये म्हटले आहे की पाकिस्तान सीमेला लागून असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमा रेषेवर गेल्यावर्षी 26 डिसेंबर पर्यंत शस्त्रसंधी उल्लंघनाच्या 820 घटना घडल्या आहेत. सुरक्षा यंत्रणांनी जम्मू-काश्मीरमध्ये एकूण 210 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. यातील 72 एलओसीवर आणि 148 काश्मीरच्या आतील भागात झालेल्या कारवाईत मारले गेले. 

बातम्या आणखी आहेत...