आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोलकाता - गेल्या काही दिवसांपासून तुतिंग येथे चीनी सैनिकांच्या घुसखोरीनंतर इंडियन आर्मीने सोमवारी म्हटले आहे की आमचे जवान कोणत्याही कारवाईसाठी तयार आहे. आर्मीने म्हटले आहे, की आम्हाला आशा आहे की चीनची पीपुल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) यापुढे अशी चूक करणार नाही. तुतिंग भागात चीन आर्मीची रस्ते निर्माण करणारी टीम भारतीय सैन्याने माघीरी धाडली आहे. अशीही माहिती आहे की चर्चेनंतर भारतीय सैन्याने त्यांचे साहित्य आणि मशिनरी परत केली आहे. चीनकडून सीमेवर जवानांच्या हलचाली वाढवण्यासाठी ब्रम्हपुत्रान नदीच्या आसपास इन्फ्रास्ट्रक्चरचे कामकाज वेगाने सुरु करण्यात आले आहे. गेल्यावर्षी जुलै-ऑगस्ट मध्ये सिक्कीम येथील डोकलाम येथे दोन्ही देशांचे जवान 74 दिवस आमने-सामने होते.
चीनी सैनिकांना पिटाळले?
- न्यूज एजन्सीच्या वृत्तानुसार, ईस्टर्न कमांडचे ऑफिसर लेफ्टनंट जनरल अभय कृष्णा यांनी आर्मी डेच्या निमित्ताने सांगितले की चीनी आर्मीची एक टीम अरुणाचल जवळील तुतिंग येथे रस्ता बांधत होते. याची माहिती मिळताच आमच्या सैनिकांनी तिथे जाऊन सैनिकांशी चर्चा केली आणि त्यांना परत पाठवले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.