आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंडियन ऑइल Petrol पंपांवर सर्वात जास्त कापला जातोय तुमचा खिसा, सरकारी रिपोर्टमध्ये खुलासा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली - आपण जेव्हा पेट्रोल भरण्यासाठी जातो तेव्हा कंपनी पाहून पेट्रोल भरत नाहीत. जो पेट्रोल पंप दिसेल, त्यावर निर्धास्त होऊन पेट्रोल भरतो. परंतु आता थोडी सावधगिरी बाळगा. कारण बहुतांश लोक सरकारी पेट्रोल पंपांवरून इंधन भरण्यासाठी पसंती देतात, लोक सरकारी पेट्रोल पंपांवरून इंधन भरणे जास्त पसंत करतात, परंतु आता सर्वात जास्त फसवणूक सरकारी पेट्रोल पंपांवरूनच होते. पेट्रोलियम मंत्रालयाद्वारे लोकसभेत नुकत्याच सादर करण्यात आलेल्या एका अहवालानुसार, 2015-2017 दरम्यान इंडियन ऑइल, BPCL आणि HPCL पेट्रोल पंपांवर फसवणुकीची एकूण 10,898 प्रकरणे समोर आली. यापैकी सर्वात जास्त प्रकरणे इंडियन ऑइल पेट्रोल पंपांवरील आहेत.

 

इंडियन ऑइलच्या पंपांवर सर्वात जास्त फसवणूक

डाटानुसार, इंडियन ऑइल पेट्रोल पंपांवर फसवणूक झाल्याच्या प्रकरणांची संख्या 3901 आहे. यापैकी 1183 प्रकरणांत भेसळ आणि 2718 प्रकरणांत पेट्रोल-डिझेल कमी देण्यात आल्याचे समोर आले आहे. दुसरीकडे, देशातील 36 राज्यांचे आकलन केल्यास सर्वात जास्त उत्‍तर प्रदेशातील इंडियन ऑइल पेट्रोल पंपांवर फसवणूक होत आहे.

 
HPCL आणि BPCL पेट्रोल पंपांवरील किती प्रकरणे
रिपोर्टनुसार, भारत पेट्रोलियम (BPCL) पेट्रोल पंपांवर फसवणुकीची एकूण 3103 प्रकरणे समीक्षाधीन काळात समोर आली. यापैकी 731  प्रकरणांत भेसळ आणि 2372 प्रकरणांत कमी इंधन दिल्याचे समोर आले. राज्‍यांच्या हिशेबाने BPCL पेट्रोल पंपांवर भेसळीची सर्वात जास्त प्रकरणे कर्नाटकात आणि कमी पेट्रोल- डिझेल देण्याची आल्याची महाराष्ट्रातील आहेत.

 
दुसरीकडे हिंदुस्‍तान पेट्रोलियम (HPCL) च्या पेट्रोल पंपांवर 2015-2017
दरम्यान फसवणुकीची 3894 प्रकरणे घडली. यापैकी भेसळीची 1136 
प्रकरणे आणि कमी इंधन दिल्याची 2758 प्रकरणे आहेत. राज्यांच्या हिशेबाने HPCL पेट्रोल पंपांवर सर्वात जास्त फसवणूक महाराष्ट्रात झाली. 

 

महाराष्ट्रात सर्वात जास्त फसवणूक
पेट्रोल पंपांवर फसवणुकीची सर्वात जास्त प्रकरणे महाराष्ट्रातील आहेत. डाटानुसार, 2015-2017 मध्ये महाराष्‍ट्रात पेट्रोल-डिझेलमध्ये भेसळीचे 466  आणि कमी इंधन दिल्याची 
1560 प्रकरणे समोर आली. महाराष्‍ट्रानंतर उत्‍तर प्रदेश, कर्नाटक, दिल्‍ली, गुजरात यांचा नंबर लागतो.  

 

 

 

बातम्या आणखी आहेत...