आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • जाणून घ्या: कसे असतात NSG कमांडो, हायटेक शस्त्रास्त्रांसोबत केवढी खडतर असते ट्रेनिंग Indias No One NSG Commandos Now Deployed In Anti Terror Operations In Kashmir

NSG कमांडो काश्मिरात तैनात; दहशतवाद्यांचे हे कर्दनकाळ वापरतात एवढी हायटेक शस्त्रास्त्रे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पेशल डेस्क - दहशतवाद्यांचा बीमोड करण्यासाठी ब्लॅक कॅट नावाने प्रसिद्ध असलेल्या NSG कमांडोजना जम्मू-काश्मिरात तैनात करण्यात येणार आहे. गृह मंत्रालयाने नुकतीच याची माहिती जाहीर केली होती.

 

देशातील सर्वात खतरनाक NSG कमांडो फोर्सला दहशतवाद्यांची कर्दनकाळ म्हणून ओळखले जाते. मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ला, पठाणकोट एअरबेसवरील दहशतवादी हल्ला आणि अक्षरधाम दहशतवादी हल्ल्यातही NSGच्या कमांडोंनीच दहशतवाद्यांना यमसदनी पाठवले होते.

 

> हे कमांडो राज्य पोलिसातील जवानांना ट्रेनिंग देतील, अशी सूत्रांची माहिती आहे. सोबतच दहशतवाद विरोधी मोहिमांमध्येही यांचा वापर केला जाऊ शकतो. एक अधिकारी म्हणाले की, एनएसजीची एक टीम खूप दिवसांपासून काश्मीर खोऱ्यात तैनात आहे आणि ते शहराबाहेरच्या परिसरात अतिशय खडतर असे प्रशिक्षण घेत आहेत. नुकतेच भाजपने पीडीपी आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेतला. त्यानंतर तेथे आता राज्यपाल राजवट लागू झाली आहे. काश्मिरात एनएसजी कमांडोंच्या तैनातीचे पाऊल अशा वेळी उचलण्यात आले आहे, जेव्हा चकमकींच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. यात सुरक्षा दलांचे अनेक जवान वीरगतीला प्राप्त झाले.

 

> NSG कमांडोज हवा, पाणी, जमीन आणि आग लागलेल्या परिसरातही हल्ला करण्यात सक्षम असतात. एका साधारण सैनिकाच्या तुलनेत पाण्यात लपण्याची आणि तेथून हल्ला करण्याची ताकद जास्त असते. NSG कमांडोज अत्याधुनिक शस्त्रांनी आणि उपकरणांनी युक्त असतात.  NSG ची क्रेक टीम लांबून मारा करणाऱ्या स्नायपरशिवाय एमपी 5 सबमशीनगन, स्नाइपर राइफल, वाल पेनिट्रेशन रडार, ग्लोक पिस्टल आणि सी-4 एक्स्प्लोझिव्ह वापरते. 

 

एवढी कठीण असते ट्रेनिंग...

> एनएसजीच्या एकेका कमांडोची ट्रेनिंग अतिशय कठीण असते. जास्ती जास्त सक्षम जवानांचा NSG मध्ये समावेश करण्यासाठी खडतर ट्रेनिंग घेतली जाते. यासाठी सर्वात आधी ज्या कमांडोजची निवड होते, ते आपापल्या तुकडीचे सर्वश्रेष्ठ सैनिक असतात. यानंतरही त्यांना अनेक टप्प्यांतून जावे लागते. शेवटी हे सैनिक ट्रेनिंगसाठी मानेसरला पोहोचतात.

ट्रेनिंग सेंटरला गेल्यानंतर प्रत्येक सैनिक कमांडोच बनतो, असे नाही. 90 दिवसांच्या कठोर ट्रेनिंगच्या आधीही एक अशीच ट्रेनिंग होते. यातून 15 ते 20 टक्के सैनिकच अखेरच्या टप्प्यात पोहोचण्यात यशस्वी होतात.

> NSG मध्ये 53 टक्के सैन्यातून, तर 47 टक्के कमांडो 4 पॅरामिलिटरी फोर्सेस म्हणजेच CRPF, ITPB, रॅपिड अॅक्शन फोर्स आणि BSF मधून येतात. या कमांडोजचा कमाल सेवाकाळ हा 5 वर्षांचा असतो. आणि पूर्ण 5 वर्षेही फक्त 15 ते 20 टक्के कमांडोंना ठेवले जाते. उर्वरित 3 वर्षांनंतर त्यांच्या मूळ सैन्यशाखेत परत पाठवले जातात.

> सध्या देशात VVIP म्हणजेच अतिमहत्त्वाच्या अशा 15 व्यक्ती आहेत, त्यांच्या सुरक्षेत एनएसजीचे कमांडो बंदोबस्तात असतात. एनएसजीमध्ये असणाऱ्या निरीक्षक लेव्हलच्या ऑफिसरचे वय 35 वर्षांच्या आसपास असते. तर सर्वसाधारणपणे प्रत्यक्ष कारवाई करणाऱ्या कमांडोंचे वय यापेक्षा कमी असते. 

 

खतरनाक ट्रेनिंग हीच NSGची ताकद
> इतर कोणत्याही सामान्य सैनिकाला आपल्या 20 वर्षांच्या सेवाकाळात जेवढ्या ट्रेनिंगमधून जावे लागत नसेल, त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त कडक ट्रेनिंगमधून या एनएसजी कमांडोंना आपल्या 3 ते 5 वर्षांच्या सेवाकाळात जावे लागते. एनएसजीमध्येही दोन विभाग असतात. पहिला- एसएजी म्हणजेच स्पेशल अॅक्शन ग्रुप आणि दुसरा एसआरजी म्हणजेच स्पेशल रेंजर्स ग्रुप.

 

निवडलेल्या 100 मधून एकच बनू शकतो ब्लॅक कॅट

> एनएसजी ट्रेनिंग अनेक टप्प्यांतून जाते. ज्याअंतर्गत जवानांची मेडिकल, फिजिकल आणि मेंटल टेस्ट केली जाते. 90 दिवसांची ही ट्रेनिंग एवढी खतरनाक असते की, शेवटी एक टक्केच जवान एनएसजी कमांडोज बनू शकतात. याशिवाय ट्रेनिंगमध्ये सहभागी जवानांना एकतर रिजेक्ट केले जाते, वा मग स्वत:हूनच ते ट्रेनिंग अर्धवट सोडून जातात.

> ट्रेनिंगच्या सुरुवातीला 18 मिनिटात 26 एक्सरसाइज करण्यात पास व्हावे लागते. यादरम्यान 780 मीटरची अडथळ्यांची शर्यत असते. ही पार न करणाऱ्या जवानांना रिजेक्ट केले जाते. दुसरीकडे, ए कॅटेगरी मिळवण्यासाठी कमांडोजना हा पूर्ण कोर्स 9 मिनिटांत पूर्ण करून दाखवावा लागतो. तथापि, यासाठी जास्तीत जास्त 25 मिनिटांचा वेळ मिळतो.

 

अचूक निशाणा ही खासियत

> एनएसजी कमांडोजचा निशाणा अगदी अचूक असतो. असे म्हणतात की, ते फक्त अंदाज लावून डोळे बंद करूनही शत्रूला गारद करू शकतात.
अचूक निशाणा होण्यासाठी 50 ते 62 हजार गोळ्यांची फायरिंग करून प्रॅक्टिस करतात. तथापि, एक सामान्य सैनिक आपल्या 20 वर्षांच्या पूर्ण कार्यकाळातही एवढी फायरिंगची प्रॅक्टिस करत नाही.
> यांची फायरिंग ट्रेनिंगसुद्धा सर्वात वेगळी आणि जटिल असते. यादरम्यान कमांडोजना 25 सेकंदांत 14 वेगवेगळ्या टारगेटवर निशाणा लावायचा असतो. हे सर्व निशाणे वेगवेगळे असू शकतात. यादरम्यान, जर एखाद्या जवानाने एका वेळेत 10 पेक्षा कमी निशाणे लावले, तर त्याला तेवढ्याच वेळा आणखी जास्त प्रॅक्टिस करावी लागते, जोपर्यंत तो निश्चित टारगेट संख्येवर निशाणा साधत नाही. 

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, भारताच्या सर्वात सक्षम या कमांडोंजचे काही Photos...   

 

बातम्या आणखी आहेत...