आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आहे देशातील दुसऱ्या मुस्लिम IPS, उत्तर प्रदेशातील छोट्या गावात झाला जन्म

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिमला - देशातील दुसरी महिला IPS अंजुम आरा या उत्तर प्रदेशातील आजमगड या छोट्याशा कम्हरिया गावच्या रहिवासी आहेत. त्यांनी जेव्हा आयपीएस होण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा अनेकांनी त्यांना ध्येयापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी हार मानली नाही. कुटुंबाच्या सपोर्टने अंजुम यांनी आपले स्वप्न पूर्ण करुन दाखवले. त्यांचे पती युनूस खान हे देखील IAS आहेत. या IPS-IAS दाम्पत्याने जम्मू-काश्मीरमध्ये शहीद नायब सुभेदार परमजीतसिंह यांच्या मुलीचा शिक्षणापासून लग्नापर्यंतचा संपूर्ण खर्च उचलण्याची जबाबदारी उचलली आहे. 

 

छोट्याशा गावात झाला जन्म 
- अंजुम यांचा जन्म लखनऊमधील आजमगडच्या कम्हरिया या छोट्या गावात झाला होता. 
- त्यांचे वडील सिव्हिल इंजिनिअर आणि आई गृहणी आहे. त्यांचे शिक्षण लखनऊमध्ये झाले. 
- अंजुम यांनी कॉम्प्यूटर इंजिनिअरिंग केले आहे. त्यानंतर वडिलांच्या मार्गदर्शनात दुसऱ्या प्रयत्नात त्या IPS परीक्षा क्वालिफाय केली. 
- त्यांची पहिली पोस्टिंग शिमलामध्ये ASP म्हणून झाली होती. अंजुम आता हिमाचलमधील सोलन जिल्ह्यात पोलिस अधीक्षक (SP) आहे. 
- त्यांचे पती युनुस खान हे कुल्लु येथे जिल्हाधिकारी आहे. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, ब्युरोक्रॅट कपल्सचे फोटो... 

बातम्या आणखी आहेत...