आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंदूरच्या रणछोडदास आश्रमातील बाबा चे अल्‍पवयीन विद्यार्थिनीशी भावा-बहिणीसमोर चाळे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर (मध्य प्रदेश)- मध्य प्रदेशातील इंदूरच्या रणछोडदास आश्रमातील बाबाला १३ वर्षांच्या मुलीसोबत अश्लील चाळे केल्यावरून अटक करण्यात आली. हा बाबा तिच्या भावा-बहिणीसमोर असे चाळे करायचा. हा प्रकार गेल्या दोन महिन्यांपासून सुरू होता. मुलांनी कोणाला ही गोष्ट सांगू नये म्हणून तो त्यांना मारहाण करत असे. पोलिसांनी बाबाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. बाबाला अटक केल्यानंतर संतप्त जमावाने बाबाला बेदम मारहाण केली. हा अाश्रम गुजरातेतील एका विश्वस्त संस्थेचा आहे. जबलपूर येथील रहिवासी असलेला अवधेश जोशी या आश्रमाची देखभाल करत होता. या आश्रमात एक व्यक्ती त्याची आई व ४ मुलांसह राहत होती. त्याने काही महिन्यांपूर्वी बाबाकडून ७ - ८ हजार रुपये उसनेे घेतले होते. मुलांना सोडून आजी व वडिल निघून गेल्याने त्यांच्या असहायेतचा फायदा बाबाने घेतला. 

बातम्या आणखी आहेत...