आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंदुकीच्या धाकाने 3 साध्वींवर 10 जणांचा रेप, एकीचे ओरडणे ऐकून आलेल्या दोघींवरही...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवादा (बिहार) - येथे संत कुटीर आश्रमात 3 साध्वींवर बलात्कार करण्यात आला. साध्वी मदतीसाठी ओरडल्यावर तिला वाचवण्यासाठी गेलेल्या दोन गुरू बहिणींवरही आरोपींनी  बलात्कार केला. याप्रकरणी 5 जणांची नावे आली असून 5 अज्ञातांविरुद्धही पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. तिन्ही साध्वींचा कोर्टात जबाब नोंदवण्यात आला असून त्यानंतर मेडिकल तपासणीही करण्यात येईल. डीआयजी विनय कुमार आणि एसपी विकास वर्मन यांनी संत कुटीर आश्रमात जाऊन याप्रकरणी चौकशी केला. डीआयजी म्हणाले की, याप्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे. 

 

आश्रमाच्या संचालिकेवरही पीडितांप्रमाणे अत्याचार...
या घटनेची तक्रार आश्रम संचालिकेद्वारे नोंदवण्यात आली. पीडित महिलांमध्ये तीही सामील आहे. साध्वींनी सांगितले, संस्थेचे प्रमुख परमहंस सच्चिदानंद आहेत, जे प्रवचने देतात.

 

काय आहे प्रकरण?
पीडित साध्वी म्हणाल्या की, त्या 8-10 वर्षांपासून सन्यासी घेऊन संत कुटीर आश्रम, बहियारात राहत आहेत. बिहारशिवाय झारखंड, छत्तीसगड आणि उत्तर प्रदेशात प्रवचनांसाठी जातात. परंतु 12 डिसेंबरच्या रात्री 10 वाजता दारावर काही लोक आले आणि दार उघडण्यासाठी सांगितले. परिचित श्याम चौघरी ऊर्फ तपस्यानंद म्हणाले की, मी आहे... यानंतर दरवाजा उघडण्यात आला.

 

एक लाख अकरा हजार रुपयेही लुटून नेले आरोपींनी
तक्रारकर्त्या म्हणाल्या की, त्या जोरात ओरडल्या. आवाज ऐकून दोन गुरू बहिणी धावत आल्या. परंतु आरोपींनी सर्वांना ताब्यात घेतले. त्यानंतर पिस्तुलाचा धाक दाखवून खोलीत आणि किचनमध्ये नेऊन बलात्कार केला. एवढेच नाही, तपस्यानंदने कपाटाची किल्ली मागितली आणि 1 लाख 11 हजार रुपयेही घेतले. दिलचंद पटेलने धमकी दिली की, पोलिसांत गेलीस तर परिणाम वाईट होतील. साध्वींनी म्हटले की, त्यातील 5 जणांना आम्ही चांगले ओळखतो. तर इतर 5 जणांना पुन्हा पाहिल्यावर ओळखू शकेल. साध्वी म्हणाल्या की, धमकी दिल्यानंतर खूप भ्यायलेली होते, परंतु पुन्हा हिंमत करून 4 जानेवारीला गोविंदपूर पोलिसांत तक्रार दाखल केली. 

यूपीच्या संतावर जिने रेपची तक्रार केली, 18 दिवसांनी तिच्या वडिलांवर बिहारमध्ये दाखल झाली तक्रार


यूपीच्या संतावर जिने बलात्काराची तक्रार दाखल केली, बिहारमध्ये पीड़ितेच्या वडिलांना आरोपी बनवण्यात आले आहे. पोलिस सूत्रांनुसार, 17 डिसेंबरला यूपीच्या पोलिसांत परमहंस सच्चिदानंद महाराजविरुद्ध रेपची तक्रार दाखल करण्यात आली होती. सच्चिदानंद बिहारच्या गोविंदपूरच्या बहियारा येथील संत कुटीर आश्रमातील प्रमुख आहेत. सच्चिदानंद फरार आहे. त्याच्या अटकेसाठी यूपी पोलिसांनी संत कुटीर आश्रमावर छापेमारी केलेली आहे.

 

पूर्ण घटनाक्रमाची चौकशी करताहेत पोलिस अधिकारी
यूपीच्या या घटनेच्या तब्बल 18 दिवसांनंतर 4 जानेवारी रोजी संत कुटीर आश्रमातील 3 साध्वींच्या तक्रारीवरून गोविंदपूर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. एसपी विकास वर्मन म्हणाले की, दोन्ही पैलूंवर पोलिस तपास करत आहेत. साध्वींच्या सुरक्षेसाठी पोलिस दल तैनात करण्यात आले आहे. दुसरीकडे, पोलिस या पैलूवरही तपास करत आहेत की, ज्याला आरोपी करण्यात आले आहे, त्याच्या मुलीने 17 डिसेंबर रोजी आश्रमाचे प्रमुख सच्चिदानंद परमहंसविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीत सच्चिदानंदशिवाय इतरांवरही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

 

आधीही वादग्रस्त ठरला होता आश्रम...
आश्रम आधीपासूनच वादग्रस्त ठरला आहे. पोलिसांच्या मते, 6 वर्षांपासून आश्रम अकबरपूर पोलिस स्टेशनजवळ होते, परंतु आश्रम प्रमुखावर दोन सख्ख्या बहिणींचे लैंगिक शोषण केल्याचे प्रकरण समोर आले होते. मोठ्या बहिणीने विरोध केला होता. यासंबंधी अकबरपूर पोलिसांत तक्रार दाखल आहे. या घटनेनंतर या आश्रमाला गोविंदपूरला स्थलांतरित करण्यात आले. सच्चिदानंद महाराज विशिष्ट पूजेच्या निमित्ताने आश्रमात येतो. तो येण्याआधी यूपीतील काही लोकही आश्रमात येतात.  

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज व घटनेची इन्फोग्राफिक माहिती...

बातम्या आणखी आहेत...