आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • धक्कादायक: नराधमाने जामिनावर सुटताच पुन्हा एका चिमुरडीवर केला बलात्कार 3 Years Old Girl Dushkarm

10 वर्षीय मुलीवरील रेप केसमधून जामिनावर सुटला, आता 3 वर्षांच्या मुलीवर केला बलात्कार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीगंगानगर (जयपूर) - 5 महिन्यांपूर्वी रावला परिसरात 10 वर्षीय बालिकेवरील बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीने जामिनावर जेलबाहेर येताच बुधवारी पुन्हा एकदा पाशवी कृत्य केले. आरोपीने केवळ 3 वर्षांच्या बालिकेला आपल्या वासनेची शिकार बनवले. आरोपी बुधाराम (रा. बावरी, वॉर्ड नंबर 21, धक्का बस्ती, घड़साना) याला लोकांनी घटनास्थळी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना घड़सानाच्या एका वीटभट्टीजवळ घडली. लहान मुलगी रडत असल्याचा आवाज ऐकून कुटुंबीयांनी तिकडे धाव घेतली तेव्हा एका खड्ड्यामध्ये नराधम बालिकेवर रेप करताना दिसला. पीड़ित मुलीचे वडील आणि त्यांच्या साथीदारांनी आरोपीला घटनास्थळीच पकडले आणि लगेच पोलिसांना माहिती दिली. तेथे पोहोचलेल्या पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलिस म्हणाले, बुधारामने यापूर्वीही बलात्काराचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. त्या प्रकरणातून तो 12 मार्च रोजीच जामिनावर बाहेर आला होता.

 

चिमुरडीला बसला धक्का, आईने खाऊ घातल्यावर जेवलीही नाही
> येथे मजुरीकाम करणाऱ्या कुटुंबाने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की, त्यांना अशा प्रसंगाला तोंड द्यावे लागेल. या घटनेने पूर्ण कुटुंबाला हादरवून सोडले आहे. यानंतर माध्यमांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी पोहोचले, तेव्हा पीडित चिमुरडी प्रचंड भ्यायलेली दिसली. तिच्या डोळ्यांत एवढी दहशत होती की, आपल्या घरच्यांनाही ती पाहू इच्छित नव्हती. ज्या आईच्या मांडीवर रोज आपले डोके ठेवून झोपायची, तिच्या हातून बिस्किटही ती खात नव्हती. या घरातील चूल बंदच राहिली. आईने रडून-रडून मोठा आक्रोश केला, पीडितेचा बाप तर उद्ध्वस्त झाला होता. 

> फक्त 3 वर्षांची ती पोर. तिला हेही माहिती नाही की, तिच्यासोबत काय घडले आहे? कालपर्यंत हसणारी खेळणारी मुलगी आज कुणालाही पाहून प्रचंड घाबरून जाते.

> वडील म्हणाले, आम्ही जर घटनास्थळी पोहोचलो नसतो, तर त्या नराधमाने हिचा जीवच घेतला असता. पीडितेची आई रडतच म्हणाली की, पोटापाण्यासाठी एवढ्या दूर आम्ही आलो, आता मात्र एक दिवसही येथे राहणार नाही. पीडितेच्या आई पुढे बोलूच शकली नाही, रडतच म्हणाली- माझ्या मुलीवर अत्याचार करणाऱ्याला फाशीच झाली पाहिजे.

 

आरोपीचे मानसिक संतुलन ढळलेले - डॉ. अग्रवाल 
> मानसिकरोग विशेषज्ञ डॉ. पी. पी. अग्रवाल म्हणाले की, सर्वसाधारणपणे कोणतीही व्यक्ती जबरदस्ती संबंध बनवण्याचा प्रयत्न करत असेल तर तेव्हा तो नॉर्मल नसतो. आरोपीने तर अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा दुसरा प्रयत्न केला आहे. बहुधा तो मानसिक रुग्ण असावा. अशा व्यक्ती आतल्या आतच कुंठित होत जातात आणि संधी मिळताच दुष्कृत्याचा प्रयत्न करतात.

 

पॉक्सो अॅक्ट कडक झाल्यानंतर श्रीगंगानगरमधले पहिले प्रकरण
> सूत्रांनुसार, चिमुरडी एका वीटभट्टीवर काम करणाऱ्या कुटुंबातील आहे. हे कुटुंब मूळचे यूपीचे. याबाबत पीडितेच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार देताना सांगितले की, बुधवारी सर्व कुटुंब वीटभट्टी मजुरीकाम करत होते. त्यांची 3 वर्षांची मुलगी जवळच खेळत होती. अचानक ती गायब झाली. घरातील सदस्य आणि इतर मजूर तिचा शोध घेत होते. तेवढ्यात तिच्या रडण्याचा आवाज ऐकून आम्ही तेथे गेलो. पाहिले तर एक नराधम त्यांच्या 3 वर्षीय मुलीवर बलात्कार करत होता. त्यांनी सर्वांनी मिळून आरोपीला घेरले आणि पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

 

काय म्हणाले पोलिस?
> पोलिस स्टेशन प्रभारी विक्रमसिंह चौहान म्हणाले की, पीड़ित बालिकेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम 376, 511, 354 व 3/4 पॉक्सो अॅक्टमध्ये गुन्हा दाखल केला आहे. आरोपी बुधाराम नानकराम बावरी याला अटक करण्यात आली असून त्याचीही मेडिकल टेस्ट सुरू आहे. विशेष म्हणजे, या आरोपीला 1 डिसेंबर 2017 रोजी रावला येथे 10 वर्षीय बालिकेवर बलात्काराच्या प्रयत्नामुळे अटक झाली होती. तो नुकताच जामिनावर बाहेर आला होता.


गुन्हा सिद्ध झाल्यास 20 वर्षे कैद ते फाशीची शिक्षा

> 12 वर्षांपर्यंतच्या मुला-मुलींवर बलात्कार: दोषीला कमीत कमी 20 वर्षै, जन्मठेप आणि मृत्यूची शिक्षा.
> 16 वर्षांपर्यंतच्या मुला-मुलींवर बलात्कार: कमीत कमी 20 वर्षांची कैद

> 16 वर्षांपर्यंतच्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्यास जन्मठेपेची शिक्षा होईल.
> महिलांवर बलात्कार झाल्यास: कमीत कमी शिक्षा ही 7 वर्षांहून वाढवून 10 वर्षे करण्यात आली आहे.

> बलात्काऱ्यांसाठी: बलात्काराच्या आरोपींना अग्रिम जामीन नाही.

> आरोपीच्या जामीन अर्जावर सुनावणीपासून 15 दिवसपूर्वी फिर्यादी आणि पीडिता व तिच्या कुटुंबीयांना कोर्टाकडून सूचना दिली जाईल.


2 महिन्यांत चौकशी, 10 महिन्यांत निकाल
> अल्पवयीनांवर बलात्कार प्रकरणात सरकार फास्ट ट्रॅक कोर्टही स्थापणार आहे.

> सर्व पोलिस स्टेशन्सना फोरेन्सिक तपासणी किट दिली जाईल.
> बलात्काराच्या खटल्याचा तपास 2 महिन्यांत पूर्ण करावा लागेल.
> 6 महिन्यांच्या आत अपीलचा निपटारा करावा लागेल.
> पूर्ण खटला एकूण 10 महिन्यांत निकाली काढणे अनिवार्य.

(हे बदल पॉक्सो अॅक्टमध्ये झाले आहेत. याची अधिसूचना 22 एप्रिल रोजीच जारी झाली आहे.)

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या संतापजनक प्रकरणाचे इन्फोग्राफिक्स... 

बातम्या आणखी आहेत...