आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

100 फुट बोरमध्‍ये पडला 4 वर्षाचा मुलगा; आतमधुन करतोय वाचवण्‍यासाठी विनवणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देवास- मध्य प्रदेशातील देवासजवळील उमरिया गावात शनिवारी चार वर्षांचा रोशन नावाचा मुलगा १०० फूट खोल बोअरवेलमध्ये पडला.  सुमारे ३० फूट खोल खाईत तो अडकला होता. त्याला वाचवण्यासाठी पोलिस दल व बचाव पथकाने नळीद्वारे ऑक्सिजनचा पुरवठा दिला आहे. मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकू येत आहे. शेतातील बोअरवेलमध्ये पडलेला हा रोशन कांजीपुरा येथील भीमसिंह कोरकू यांचा मुलगा आहे. रोशनची आई रेखा हिने सांगितले, ती शेतात काम करत होती. तीन मुले बोअरवेलजवळ खेळत होती. मुलाला वाचवण्यासाठी शेतात दुसऱ्या जेसीबीने एक समानानंतर खड्डा करण्यात येत आहे. रात्री उशिरापर्यंत त्याला वाचवण्याचे प्रयत्न सुरू होते.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, अाणखी फोटो...

बातम्या आणखी आहेत...