आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्याच्याकडे कराटे शिकायला गेली त्यानेच घरात बेशुद्ध करून केला रेप, मग 4 महिने केले असे ब्लॅकमेल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कानपूर - कराटे शिकण्यासाठी गेलेल्या तरुणीवर ट्रेनरनेच लग्नाचे आमिष दाखवून 4 महिने रेप केला. पीडितेचा आरोप आहे की, ''ट्रेनर आधीपासूनच विवाहीत आहे. एवढेच नाही, तिने उन्नाव कोर्टात बनावट कागदपत्रे सादर करून खोटे लग्नही केले. या बाबीची माहिती मिळाल्यावर त्याने माझे अश्लील व्हिडिओ दाखवून टॉर्चर केले, जिवे मारण्याची धमकीही देऊ लागला." सध्या पोलिसांनी तरुणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.   

 

शेवटच्या स्लाइडवर पाहा, या प्रकरणाचा व्हिडिओ...

 

असे आहे पूर्ण प्रकरण...
-सू्त्रांनुसार, पीडित तरुणी निधी (काल्पनिक नाव) मूळची रायबरेलीची रहिवासी आहे. सेल्फ डिफेन्ससाठी ती कानपूरमध्ये ज्युदो-कराटे शिकायला गेली होती.
-यादरम्यान ती कानपूरच्या रामदेवी परिसरात राहत होती. येथील उमाशंकर गौतम कराटेची ट्रेनिंग देतो, त्याच्याकडेच निधी कराटे शिकण्यासाठी जात होती.
-पीडितेने सांगितले, ''सप्टेंबर 2017 मध्ये एका दिवशी उमाशंकरने मला आपल्या घरी बोलावले. तेथे जेव्हा मी गेले तेव्हा त्याने मला नाष्टा खाऊ घातला. यानंतर मी बेशुद्ध झाले. त्याने माझ्यासोबत घृणास्पद काम केले. संध्याकाळी शुद्धीत आल्यावर उमाशंकरने मला व्हिडिओ क्लिप दाखवली. ती पाहून मी खूप घाबरले. त्याने मला जिवे मारण्याची धमकी देऊन गुपचूप घरी जाण्यास सांगितले.''
-''यानंतर मला बदनाम करण्याची धमकी देऊ लागला आणि जिवे मारीन म्हणून धाक दाखवून दररोज बलात्कार करत राहिला. मी त्याला लग्नाचे म्हणाले तेव्हा त्याने 10 जानेवारी 2018 रोजी उन्नावमध्ये एका नोटरीत बनावट कागदपत्रे करून खोटे लग्न केले आणि मग सातत्याने रेप करत राहिला.''
-''मला जेव्हा तो आधीपासूनच विवाहित असल्याचे कळले तेव्हा मी त्याचा विरोध केला. यावर तो म्हणाला की, माझी पत्नी वकील आहे, ती तुझी जिंदगी बरबाद करून टाकीन. माझ्यासमोर आता दुसरा कोणताही पर्याय नव्हता. काय करावे काहीच कळत नव्हते, पण मी एका सामाजिक संस्थेशी संपर्क केला आणि त्याला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला.''

 

काय म्हणतात सामाजिक संस्थेचे सदस्य... 
-सामाजिक संस्थेचे सदस्य साक्षी म्हणाले, तरुणीचा आरोप आहे की कराटे टीचर तिच्यावर रेप करत होता. त्याने खोटे लग्नही केले. ती कानपूरमध्ये एकटीनेच किरायाने राहत होती. आम्ही पीडित तरुणीच्या आईबाबांनाही बोलावले आहे. त्यांना या घटनाक्रमाबाबत माहिती दिली आहे.

 

काय म्हणतात पोलिस अधिकारी?
-एसपी ईस्ट अनुराग आर्या म्हणाले की, तरुणीने एका कराटे प्रशिक्षकावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. तिच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणीने सांगितल्यानुसार ती कराटे शिकण्यासाठी जात होती. दरम्यान, ट्रेनरने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर रेप केला. ट्रेनर आधीपासूनच विवाहित असल्याचे कळते, ही गोष्ट लपवून त्याने हे सर्व केले आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. निश्चितच योग्य ती कारवाई होईल.

 

पुढच्या स्लाइड्सवर, इन्फोग्राफिकमधून घटनाक्रम व शेवटी व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...