आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिहार : भन्नाट आहे उत्तरपत्रिकेत 101 चित्रपटांची नावे लिहिणाऱ्या या टॉपरचा किस्सा, व्हाल थक्क

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा - उद्यापासून बिहारमध्ये परीक्षांना सुरुवात होत आहे.  दोन वर्षांपूर्वी बिहार इंटर टॉपर्स घोटाळा समोर आला होता. त्यावेळी आर्ट्सची टॉपर बनलेली रुबी रॉयची उत्तरपत्रिकाही समोर आली होती. त्यावेळी रुबीने तिच्या ओरिजनल उत्तरपत्रिकांमध्ये शायरी, 101 चित्रपटांची नावे आणि 300 वेळा तुलसीदासजी असे लिहिले असल्याचे समोर आले. नंतर या उत्तरपत्रिका बदलण्यात आल्या होत्या. एक्सपर्ट्सने रूबीच्या दुसऱ्या उत्तरपत्रिका लिहिल्या होत्या. जून 2016 मध्ये हा घोटाळा समोर आल्यानंतर निकाल रद्द करण्यात आला होता.


लाखो रुपयांचे व्यवहार..
- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात असे प्रकार अनेक वर्षांपासून सुरू आहेत. 
- एज्युकेशन माफिया, अधिकारी, नेते आणि नीकटवर्तीयांना टॉपर बनवले जाते. रुबीही त्यांच्यापैकीच एक होती. 
- परिक्षेपू्र्वी अशा मुलांना निवडले जायचे. या कामासाठी कुटुंबीयांकडून लाखो रुपये घेतले जात होते. 
- ही मुलेदेखिल सामान्य मुलांप्रमाणेच परीक्षा द्यायला जायचे. 
- परीक्षेत ते पूर्ण 3 तासांचा वेळ द्यायचे. उत्तरपत्रिकेत काहीतरी लिहित राहायचे. त्यामुळे कोणाला शंका येत नव्हती. 
- परीक्षेचा वेळ संपल्यानंतर शांतपणे उत्तरपत्रिका जमा करून निघून जायचे.

 

रिव्ह्यू टेस्टमधे फेल झाली होती रुबी
- आर्ट्सची टॉपर असलेल्या रुबीने पॉलिटिकल सायन्सला प्रॉडिकल सायन्स म्हटले होते. 
- रुबी रिव्ह्यू टेस्टमध्ये फेल झाली होती. त्यामुळे तिचा निकाल रद्द केला आहे. 
- रूबीला रिव्ह्यू टेस्टमध्ये फेल झाल्यानंतर लगेचच अटक करण्यात आली. सध्या ती जामीनावर आहे.


याबाबत समजल्यानंतर काही माध्यमांनी रुबीला काही प्रश्न विचारले होते, त्यावेळी ती बरीच गोंधळली होती.. पुढे वाचा तिने काय उत्तरे दिली...

बातम्या आणखी आहेत...